गणेशोत्सवाच्या निमित्ताने ९ सप्टेंबरपासून ‘सेल्फी विथ बाप्पा’ हा उपक्रम यंदा १० दिवस आयोजित करण्यात आला आहे. आपल्या बाप्पाबरोबर काढलेले सेल्फी ‘लोकमत’कडे व्हॉटसॲप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडक छायाचित्रांना ‘लोकमत’च्या सोशल मीडिया व्यासपीठावर, तसेच वर्तमानपत्रात प्रसिध्दी दिली जाईल.
११ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अथर्वशीर्ष पठण स्पर्धेचे आयोजन केले आहे. १८ सप्टेंबर रोजी विजेत्यांची नावे जाहीर केली जातील आणि त्यांना प्रत्यक्ष पठणासाठी आमंत्रित केले जाईल.
१० सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत गौैरी गणेश आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या बाप्पाच्या सजावटीचा फोटो काढून ‘लोकमत’कडे पाठवायचा आहे. सर्वोत्कृष्ट सजावटीला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिध्द शेफतर्फे मोदकांचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. सहभागींकडून मोदकांच्या पाककृती मागवल्या जाणार आहेत. तज्ज्ञांच्या समितीकडून परीक्षण झाल्यानंतर विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. १६ सप्टेंबर रोजी उन्नती लाईव्ह वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील यशस्वी महिला सहभागी होणार आहेत. ‘लोकमत’तर्फे आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ९०२८५०८०९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आणि आपले फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१७ सप्टेंबर रोजी ‘आरतीचा तास’ आयोजित केला जाईल. ‘अर्थ अवर’ या संकल्पनेवर आधारित ही कल्पना बेतलेली आहे. या दिवशी ठरलेल्या वेळेमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांमध्ये आरती होणार आहे. याच वेळी प्रत्येकाला आपापल्या घरामध्ये महिलांच्या हस्ते आरती करून लोकमत ‘आरतीचा तास’मध्ये सहभागी होता येईल. गणेशोत्सवात दहा दिवसांमध्ये दररोज विविध क्षेत्रातील महिलांना लोकमत कार्यालयात आमंत्रित करण्यात येणार आहे. ‘तिचा संवाद’ अंतर्गत यशस्वी महिलांची मुलाखत प्रसिध्द केली जाणार आहे.