पुणे : ‘लोकमत सूर ज्योत्स्ना’ या कार्यक्रमाच्या प्रवेशिका घेण्यासाठी पुणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, पुण्यात शनिवारी (दि.२०) पंडित फार्म्स कर्वेनगर येथे सायं. ५.३० वा. स्व. ज्योत्स्नादेवी दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भक्तिसंगीत ते चित्रपटसंगीत अशी सांगीतिक सफर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सूर ज्योत्स्ना पुरस्काराच्या निमित्ताने अनेक उदयोन्मुख गुणी कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. दरवर्षी दोन कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
‘सूर ज्योत्स्ना २०१९’ च्या पुरस्काराचे मानकरी आर्या आंबेकर व शिखर नाद कुरेशी हे कलाकारही स्वरसाज चढविणार आहेत. या कार्यक्रमाचे हे सहावे पर्व आहे. दैवी आवाजाची देणगी लाभलेले सुरेश वाडकर, सावनी रवींद्र व स्वप्निल बांदोडकर ही त्रयी विविध प्रकारची गीते सादर करणार आहे. हे तीन गायक प्रथमच एका मंचावर दिसणार आहेत. हा कार्यक्रम ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. डॉ. सागर गणपतराव बालवडकर (सचिव, खंडेराय प्रतिष्ठान) प्रस्तुत ‘लोकमत सूर ज्योत्स्ना’ या कार्यक्रमाचे आयोजन कोहिनूर ग्रुपच्या सहयोगाने करण्यात आले आहे. ४या कार्यक्रमाला सेलो, रिलायन्स, ब्रह्मश्री आणि सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स, खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, लोकमान्य मल्टीपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि., कार्निव्हल सिनेमाज, काका हलवाई, रेवेल क्रिएशन्स, सुरेखा कम्युनिकेशन्स यांचे सहकार्य लाभले आहे.