पुणे: ‘ती’ आता स्वतंत्र आहे, मुक्त आहे, स्वयंभू आहे. तिने सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा बोलबाला निर्माण केला आहे. तिच्या याच मुक्त स्वातंत्र्याचा जयघोष करण्यासाठी महिला दिन हे एक निमित्त आहे. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने येत्या शनिवारी (ता. ९) दुपारी चार वाजता ‘लोकमत’च्या वतीने पुण्यातील महिलांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहराच्या विविध भागांतील महिला या मुक्त स्वातंत्र्याचा जयघोष करण्यासाठी या रॅलीत सहभागी होणार आहेत.
‘लोकमत’ सखी मंच आयोजित या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असून महिलांना यात विनाशुल्क सहभाग घेता येणार आहे. रॅलीमध्ये स्वतंत्र वेशभूषा, ग्रुप वेशभूषा, बाईक सजावट, युनिक स्लोगन यानुसार आकर्षक बक्षिसे सेलिब्रिटीच्या हस्ते दिली जाणार आहेत. त्यामुळे सर्व सखींनी पाहिजे ती वेशभूषा करून आले तरी चालणार आहे, ग्रुपने येत असाल तर ग्रुपनुसार वेशभूषा करूनसुद्धा येता येईल. रॅलीत सहभाग घेण्यासाठी स्वतःची बाईक असणे गरजेचे नाही, मैत्रिणीसोबत बाईकवर मागे बसूनदेखील सहभागी होता येऊ शकेल. या रॅलीचे नाव ‘बाईक रॅली’ असले तरी यात केवळ बाईकच असाव्यात असे बंधन नाही. बाईकऐवजी इतर दुचाकी गाड्या घेऊनही यात सहभागी होता येणार आहेत. या रॅलीसाठी बुलढाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी, सवाई मसाले हे गिफ्ट पार्टनर आहेत.
कधी - शनिवार, ९ मार्च २०२४, दु. ४ वा.
कुठे - महावीर जैन गर्ल्स हॉस्टेल, बीएमसीसी कॉलेज रोड, पुणेबुलढाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीसवाई मसाले - गिफ्ट पार्टनर
रॅलीचा मार्ग
महावीर जैन गर्ल्स हॉस्टेल, बीएमसीसी कॉलेज रोड, पुणे - फर्ग्युसन कॉलेज रस्ता - वैशाली हॉटेल - संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक - मॉडर्न इंजिनीअरिंग कॉलेज रस्ता - जंगली महाराज रस्ता - बालगंधर्व चौक - गरवारे पूल - गुडलक चौक - महावीर जैन गर्ल्स हॉस्टेल
रॅलीत सहभागासाठी खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरा