शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेसची दिमाखदार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 3:21 AM

पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कधी शिक्षणासाठी, कधी नोकरीसाठी, कधी व्यवसायासाठी प्रत्येकावर पुण्यात राहण्याची संधी एकदा तरी येते

पुणे : पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कधी शिक्षणासाठी, कधी नोकरीसाठी, कधी व्यवसायासाठी प्रत्येकावर पुण्यात राहण्याची संधी एकदा तरी येते. पुण्यातील स्वच्छ व समतोल वातावरणामुळे, सुसंस्कृत लोकांमुळे पुण्यात राहायला प्रत्येकाचीच पहिली पसंती असते आणि याचीच प्रचिती आली शनिवारी लोकमत आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१७’ या भव्य गृहप्रदर्शनात.स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे या गृहप्रदर्शनाची शनिवारी (दि. ३० सप्टेंबर) दिमाखात सुरुवात झाली. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी क्रेडाई, पुणेचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, पुण्याचे पोलीस उपायुक्त (सायबर, आर्थिक गुन्हेशाखा) सुधीर हिरेमठ, सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाचे फिल्ड जनरल मॅनेजर एस. आर. खटीक आणि सुरेखा अ‍ॅडव्हर्टायझिंगचे सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘लोकमत’चे उप महाव्यवस्थापक (दक्षिण महाराष्टÑ) (जाहिरात) अलोक श्रीवास्तव यांनी स्वागत केले. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत सर्व ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. सोमवार, (दि. २ आॅक्टोबर) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. एकाच छताखाली पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा अशा संपूर्ण जिल्ह्यातील प्रथितयश व नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५० पेक्षा जास्त गृहप्रकल्प या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी पुणेकरांनी आपल्या स्वप्नातील घर निवडण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेकांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करण्याच्या हेतूने दसºयाच्या दिवशी नोंदणी करून हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले. सदनिका, प्लॉट खरेदीचे अनेक पर्याय असल्याने आपले बजेट, सोयी-सुविधा, अपेक्षांची पूर्तता करणारा गृहप्रकल्प निवडणे सोपे जात आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी भेट दिलेल्या हजारो पुणेकरांनी आनंद व्यक्त केला. दुसºया दिवशी रविवार असल्याने सुट्टीचा सदुपयोग करीत अनेकांनी विविध परिसरातील गृहपर्यायांची माहिती घेत आपल्या नवीन घराची निश्चिती केली. पुण्यामध्ये घरखरेदी करण्यासाठी ग्राहकांसमोर अनेक पर्याय असतात. परंतु, यामध्ये विश्वासार्हतेपासून ते आपल्या आवाक्यातील चांगल्यात चांगला पर्याय निवडण्यात अनेक अडचणी येतात. या सर्व अडचणी ओळखूनच यंदा ‘लोकमत’ने महारेरा अंतर्गतच नोंदविलेल्या गृहप्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. गेल्या ६ वर्षांपासून ‘लोकमत’ प्रॉपर्टी शोकेसच्या माध्यमातून हजारो पुणेकरांना घरासाठी उत्तमातील उत्तम पर्याय मिळाला आहे. त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या प्रदर्शनात पुणे शहर परिसरातील सर्व भागांत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेणे ग्राहकांना शक्य झाले आहे. वेगवेगळ्या भागांतील आपल्या बजेटमधील घरे पाहता आली.या प्रदर्शनामध्ये वेळेची तर बचत होतेच शिवाय बांधकाम व्यावसायिक आगामी काळात येणाºया दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक भरघोस सूट व फायदे असणाºया अनेक योजनांचा लाभ प्रदर्शनामध्येग्राहकांना होत आहे. यंदाच्या प्रदर्शनामध्ये बजेट होम्स्पासून अगदी लक्झुरिअस होम्स्पर्यंत तर व्यावसायिक जागांपासून ते सध्याच्या युगात सेकंड होमच्या संकल्पनेवर आधारित ओपन बंगलो प्लॉटचे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. पुण्यातील नेहमीच वाढणाºया व भविष्यात चांगला फायदा मिळवून देणारे प्रॉपर्टीचे अनेक पर्याय या भव्य गृहप्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार आहेत. प्रदर्शनाच्या दोन्ही दिवशी पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद देत आपल्या घराची नोंदणी केली.दसºयाचा मुहूर्त साधून अनेकांनी रजिस्ट्रेशनचीही तयारी केली आहे. या प्रदर्शनाचे बॅँकिंग पार्टनर सेंट्रल बॅँक आॅफ इंडिया असून आऊटडोअर पार्टनर सुरेखा अ‍ॅडव्हर्टायझिंग आहेत.गृहप्रदर्शनाची वैशिष्ट्येमहारेराअंतर्गत नोंदवलेले पुण्यातील गृहप्रकल्प.सेंट्रल बँक आॅफ इंडियाने इच्छुक ग्राहकांचे उत्पन्न विचारात घेऊन ताबडतोब तत्त्वत: गृहकर्ज मंजुरीपत्र त्वरित देण्याची व्यवस्था केली आहे.१० लाख रु. ते ३ कोटी रु. पर्यंतचे गृहप्रकल्प.मोफत स्टँप ड्युटी व रजिस्ट्रेशन, योग्य डाऊन पेमेंट, आकर्षक ईएमआय, जीएसटी इतक्या व्याजदराच्या रकमेत सवलत यासारख्या योजना.पझेशननंतर ईएमआय फेस्टिव्हल आॅफर्सरेडीपझेशन घरांवर सवलती घराच्या नोंदणीवर रोख रकमेवर सूट, दुचाकीसारखी अनोखी भेट