"बारामती लोकसभा कोणाचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळी आलीय"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 02:08 PM2024-03-11T14:08:59+5:302024-03-11T14:10:47+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आव्हान दिले आहे.
Vijay Shivtare ( Marathi News ) : या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार अशी चर्चा सुरू आहे. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली असून महायुतीमध्ये जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीमघ्येही जागावाटपबाबत बैठका सुरू असून काल खासदार शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवारी जाहीर केली आहे. बारामतीलमध्ये यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते विजय शिवतारेही आव्हान देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
भाजपाला हुकूमशाही आणायचीय, 'त्या' वक्तव्याचं नवल नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला
एका कार्यक्रमात बोलताना विजय शिवतारे यांनी अजित पवार यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विजय शिवतारे ही निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू आहेत. एका कार्यक्रमात बोलताना विजय शिवतारे म्हणाले, लोकांसाठी मी अनेकांशी पंगा घेतला. लोकसभेची निवडणूक समोर आहे, सुप्रिया ताई, सुनेत्रा ताई असं सुरू आहे. बारामती लोकसभा हा कोणाचा सातबारा नाही, अशी टीकाही विजय शिवतारे यांनी केली.
"बारामतील लोकसभा मतदार संघात पुरंदर, भोरचाही खासदार पाहिजे. आम्ही का म्हणून यांना मतदान दहा, दहा वेळा करायचं. आम्हाला काहीच मिळालं नाही, याच ठिकाणी अजित पवार यांनी विजय शिवतारेंचा अपमान केला होता.आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असं चॅलेजं विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिलं.
"या मतदार संघात ६ लाख ८६ हजार मतदान पवारांचा आहे आणि ५ लाख ८० हजार पवार विरोधकांचं मतदान आहे. ६ लाख ८६ हजार मध्ये ते दोघे असतील आणि ५ लाख ८० हजारमध्ये एकटा विजय शिवतारे असेल. ही लढाई आता आर-पारची लढायची असा मी निर्णय घेतला आहे, असंही शिवतारे म्हणाले.
"या ठिकाणी येऊन त्यांनी पुरंदरच्या जनतेची माफी मागावी लागेल. पुरंदरच्या विमानतळाचं कधी होणार ते सांगा, माझी लढाई लोकांसाठी आहे. आता सगळ्यांनी एकत्र येऊन यांना पाडलं पाहिजे, असंही शिवतारे म्हणाले.