शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लोणावळा लोकलची वाटचाल ‘चाळीशी’ पल्ल्याड ...पण फरफट आहे सुरूच .. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 7:39 PM

एकीकडे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना आवश्यक सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन हात आखडता घेत आहे. मागील ४१ वर्षांपासून लोणावळा लोकलची ही फरफट आजही सुरूच आहे...

ठळक मुद्देतिसऱ्या व चौथ्या मार्गाची प्रतिक्षा मध्य रेल्वने दि. ११ मार्च १९७८ रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल सेवा केली सुरू लोणावळा लोकल सध्या मुख्य दोन मार्गांवरूनच आहे धावत

पुणे : लोणावळा लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यासह स्वतंत्र रेल्वे लाईन टाकण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना आवश्यक सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन हात आखडता घेत आहे. मागील ४१ वर्षांपासून लोणावळा लोकलची ही फरफट आजही सुरूच आहे. जुन्या गाड्या, फेऱ्यांमधील अधिक अंतर, स्थानकांमधील असुविधा, फेऱ्या रद्दची टांगती तलवार या चक्रात ही सेवा अडकली आहे. मध्य रेल्वने दि. ११ मार्च १९७८ रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल सेवा सुरू केली. सध्याच्या तुलनेत त्यावेळी स्थानके व प्रवाशांची संख्या खुप कमी होती. सुरूवातीला केवळ सहा डब्यांची लोकल धावत असे. कालांतराने प्रवासी संख्या वाढत गेल्याने डबे व लोकल गाड्यांची संख्याही वाढत गेली. ठिकठिकाणी नवीन स्थानके करण्यात आली. सहा डब्यांनतर, सात, नऊ आता बारा डब्यांची लोकल धावत आहे. एकुण चार रेल्वेगाड्यांमार्फत दररोज दोन्ही बाजुने प्रत्येकी २२ फेºया होतात. सुमारे पावणे दोन लाख प्रवाशांना या सेवेचा फायदा होत आहे. सुमारे ६३ किलोमीटरचे हे अंतरया दोन स्थानकांदरम्यान शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड बेगडेवाडी, घोरावडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत व मळवली ही स्थानके आहेत.मागील काही वर्षांत या मार्गावरील प्रवाशांची संख्या वेगाने वाढत गेली आहे. परिसरातील औद्योगिकरण, गावांचा झालेला विस्तार, नोकरीच्या वाढलेल्या संधी, शिक्षण संस्था यांमुळे नागरी वस्तीत मोठी वाढ झाली. परिणामी, लोकल सेवेचा प्रतिसाद वाढत गेला. पण त्या तुलनेत या लोकल सेवेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.-------- 

तिसऱ्या व चौथ्या मार्गाची प्रतिक्षालोणावळा लोकल सध्या मुख्य दोन मार्गांवरूनच धावत आहे. या मार्गावरूनच एक्सप्रेस व मालगाड्या धावतात. लोकलसाठी स्वतंत्र मार्ग करण्याची मागणी अनेक वर्षांची आहे. पण तिसऱ्या आणि चौथ्या लाईनची केवळ  घोषणा झाली आहे. काही वर्षांपूर्वी सर्वेक्षणाचेही काम झाले होते. पण अद्याप काम सुरू झाले नाही. नवीन मार्ग झाल्यास या मार्गांवरूनच लोकल सेवा सुरू होईल. त्यामुळे लोकल गाड्यांची संख्या व फेऱ्या वाढविणे शक्य होईल. पण पुणे विभागातील रेल्वे प्रशासन मात्र आता मुंबई रेल विकास कॉपोर्रेशनकडे बोट दाखवत आहे. लोकल संख्या वाढली नाही. दोन लोकलमधील अंतरही खुप आहे. जुने डबेच लोकलसाठी दिले जातात. 

................................

लोणावळा लोकल सध्या मुख्य दोन मार्गांवरूनच धावत आहे. या मार्गावरूनच एक्सप्रेस व मालगाड्या धावतात. लोकलसाठी स्वतंत्र मार्ग करण्याची मागणी अनेक वर्षांची आहे. पण तिसऱ्या आणि चौथ्या लाईनची केवळ घोषणा झाली आहे. काही वर्षांपूर्वी सर्वेक्षणाचेही काम झाले होते. पण अद्याप काम सुरू झाले नाही. नवीन मार्ग झाल्यास या मार्गांवरूनच लोकल सेवा सुरू होईल. त्यामुळे लोकल गाड्यांची संख्या व फेºया वाढविणे शक्य होईल. पण पुणे विभागातील रेल्वे प्रशासन मात्र आता मुंबई रेल विकास कॉपोर्रेशनकडे बोट दाखवत आहे.   

टॅग्स :Puneपुणेlonavalaलोणावळाcentral railwayमध्य रेल्वे