शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

लोणावळ्यात मुसळधार पाऊस, पर्यटकांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 9:56 AM

सलग 48 तास लोणावळ्यात जोरदार कोसळल्यानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.

लोणावळा : सलग 48 तास लोणावळ्यात जोरदार कोसळल्यानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. शुक्रवार सकाळ ते रविवार सकाळ ह्या 48 तासांत लोणावळा शहरात तब्बल 633 मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने लोणावळा शहर व ग्रामीण परिसर जलमय झाला होता. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुराचे पाणी कार्ला, मळवली, बोरज भागातील सोसायट्यांमध्ये घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.मळवली येथील संपर्क संस्थेत पाणी शिरले होते तर देवले येथील ओशो आश्रमात पाण्यात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांना लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग या रेस्क्यू पथकाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप बाहेर काढले. भुशी धरणाच्या पायर्‍यांवरून वेगाने पाणी वाहत असल्याने शनिवारी दिवसभर धरणावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. लोणावळा ते आयएनएस शिवाजीकडे जाणारा रस्ता क‍ाही ठिकाणी प‍ाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीकरिता बंद ठेवला होता. शहरातील वलवण गावातून जाणारा रस्ता, बापदेव रोड, नांगरगाव रोड, कुसगाव पवनानगर रस्ता, कार्ला लेणीकडे जाणारा रस्ता, मळवलीकडे जाणारा रस्ता, रायवुड येथील रस्ता, नारायणीधाम कडे जाणारा मार्ग हे बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्याने लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्याने तसेच पाण्याचे प्रवाह काही ठिकाणी आडविले गेल्याने नांगरगाव भागात पूरस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, पोलीस निरीक्षक दीपक लुकडे व त्यांची टीम हे सर्वजण दिवसभर शहरात गस्त घालत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पावसाचा जोर कमी होत नसल्याने लोणावळाकरांच्या मनात धाकधूक होती, मात्र शनिवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी वाहून जाण्यास मोठी मदत झाली. पाण्याखाली गेलेले रस्ते दिसू लागले असून सोसायट्यांमध्ये शिरलेले पाणी ओसरु लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी वारा वेगात वाहू लागला आहे.