लोणी काळभोर : सोलापूर-पुणे महामार्ग...लोणी काळभोर येथे वेळ भरदुपारी एकची.. एक पंचविशीतील गर्भवती महिला तिच्या सहा वर्षाच्या चिमुकल्या लेकीसह आकांताने रस्त्यावरील वाहन थांबविण्याचा प्रयत्न करत होती... इकडे तिच्या प्रसुतीच्या कळा वाढत गेल्या. मात्र, ना वाहन थांबायला तयार होते ना कोणी महिला तिच्या मदतीला येत होत्या. अखेर प्रसुतीच्या वेदनांनी ती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कट्ट्यावर मटकन खाली बसली... तिच्या चिमुरडीने रस्त्यावरीली लोकांना मदतीसाठी टाहो फोडला. मात्र, शेजारच्या महिलांनी नाकाला रुमाल लावत तिथून काढता पाय घेतला. अखेर ही आर्त हाक रस्त्यावरील वाहतुक पोलिसांच्या कानापर्यंत गेल्यावर ते तातडीने तिथे धावत आले. कट्ट्याच्या दोन्ही बाजूने त्यांनी रिक्षा पार्क केली. शेजारच्या दुकानातील चादर आणून रिक्षाच्या आधाराने तिच्या भोवती आडोसा तयार केली.अन् तितक्यात त्या माऊलीची रस्त्यावरच प्रसुती झाली..तिने एका सुंदर छकुली जन्माला आली. पोलिसांनी विनवणी करून एका महिलेला बोलावले. त्या महिलेने बाळाला फडक्याने पुसून त्या माऊलीच्या ताब्यात तिले मात्र नाळ तशीच राहिली अखेर पोलिसांनीच त्या बाळ-बाळांतीनीला रिक्षाता घालून जवळल्या रुग्णालयात नेले.तिथे तिच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार झाले आणि बाळ बाळंतीण सुखरूप राहिल्या.एखाद्या चित्रपटाच कथानक शोभावी अशी घटना आज वास्तवात घडली. एकीकडे सामान्य महिलांमधून नष्ट होत चाललेली माणुसकी आणि मातृत्चतेची जाणीव तर दुसऱ्या बाजूला खाकी वर्दीतील बदनाम झालेले पोलिसांमध्ये ड्युटीच्या पलिकडील संवेदनशील माणुसकी अशा दोन्ही घटना आज लोणी गावात घडलेल्या घटनांमुळे अधोेरेखीत झाल्या. सोलापूर जिल्ह्यातील एका छोड्याशा खेड्यात राहणारे दिनेश आणि कमला (दोघांची नावे बदलली आहेत) कामाच्या शोधात गाव सोडून लोणीकाळभोर येथे आले. पडेल ते काम करत गेल्या दोन वर्षापासून ते संसाराचा गाडा ओढताहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून दिनेशला काम मिळाले नाही त्यामुळे कामाच्या शोधात चार दिवसांसाठी गावाकडे गेले. चिमुकल्या लेकीबरोबर थांबलेल्या कमलाला दिनेश गावी गेल्यानंतर प्रसुतीच्या कळा यायला लागल्या. रिक्षासाठी जवळ पैसे नसल्याने ती घरापासून लोणी स्टेशनपर्यंत पायीच गेली. मात्र तिला कुणीच लिफ्ट देत नव्हते. त्यामुळे ती स्टेशनवर मदतीची हाक देत थांबून राहिली आणि तिथेचतिची प्रसुती झाली.---पोलीस हवालदार देवकर रजपूत झाले देवदूतमहिलेची प्रसुती होत असताना तेथील अनेक महिलांनी तिला मदत देण्याऐवजी नाकाला रुपाम लावून तिथून काढता पाय घेतला. मात्र ट्राफिक पोलिसांची ड्युटी करत असणारे पोलीस हवालदार संदीप देवकर व सतिष रजपूत यांनी त्या माऊलीचा टाहो ऐकून तिला रिक्षा आणि चादरीचा आडोसा दिलाच शिवाय प्रसुती होताच तिला स्वखर्चाने रिक्षातून रुग्णालयापर्यंत पोचवून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. वेळेत बाळाला रुग्णआलयात नेल्याने बाळ व बाळांतीन सुरखरूप राहिल्या. अन्यता दुपारी एकच्या तळपत्या उन्हात नवजात बाळ जास्त काळ राहिले असते तर त्याच्या जीवावर बेतू शकले असते. त्यामुळे देवदूताप्रमाणे धाऊन आलेले हवादलदार रजपूर आणि देवकर यांचे गावात कौतुक होत आहे.-----------