पुणे/सिन्नर : पुणे येथून निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा पोलिसांनी दडपशाहीने सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे अडविला. विद्यार्थ्यांनी १३ जुलैैपासून आंदोलन करणार असल्याचे निवेदन रितसर पोलिसांना दिले होते. तरीही कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत येथील पोलिसांनी विद्यार्थ्यांना नाशिककडे मार्गस्थ होण्यापासून रोखले. काही विद्यार्थ्यांसोबत पोलिसी पद्धतीने चर्चा करून सर्वांना माघारी पुणे येथे पाठविण्याची तयारी चालवली आहे. या घडल्या प्रकाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून, एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटणार असल्याचे समजते. आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे बंद करून विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनेला (डीबीटी) राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. बोगस आदिवासींना शासकीय सेवेतून काढून टाका, विद्यार्थ्यांंच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी वसतिगृहांमध्ये सुविधा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, आदिवासी मुलींना योग्य प्रकारचे संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता. या पुण्यातून निघालेला मोर्चा ८० ते १०० किमीचा प्रवास करून नांदुरशिंगोटे येथे सोमवारी पोहोचला होता. येथील इंद्रायणी लॉन्सवर त्यांचा मुक्काम होता. ही संधी साधत मोर्चेकऱ्यांना आत ठेवून पोलिसांनी बळजबरीने लॉन्सचा ताबा घेतला. वसतिगृहातील भोजनाबाबत शासनाच्या आदिवासी विभागाचा निधी थेट हस्तांतर करण्याचा (डीबीटी) शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढलेला आक्रोश मोर्चा नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर नांदूर शिंगोटे शिवारात पोलिसांनी अडविला.सायंकाळी पाचला मोर्चा नांदूरशिंगोटे येथे पोहोचल्यावर इंद्रायणी लॉन्सवर नियोजन मुक्काम होता. मोर्चातील तरुण लॉन्समध्ये दाखल झाल्यानंतर मोठा फौजफाटा दाखल झाला. ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपअधिक्षक माधव पडेले, सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्यासह शीघ्र कृती दलाचे जवान, नाशिक व नगर जिल्ह्यातील पोलीस फौजफाटा हजर झाला. उपविभागीय अधिकारी महेश पाटील दाखल झाले. निवेदन येथेच देण्याचा आग्रह पोलिसांनी धरला होता. पुण्यासह नांदेड, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा आदी जिल्ह्यातून महाविद्यालयीन आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. बंडूनाना भाबड यांनी मोर्चेकºयांच्या जेवणासह मुक्कामाची व्यवस्था केली होती. सायंकाळी आठच्या सुमारास विद्यार्थी पुढील नियोजन करत होते. पोलिसांनी अचानक कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोर्चातील विद्यार्थ्यांना पुण्याला परत पाठविण्यात येत होते. पोलिसांच्या फौैजफाट्यामुळे गावातील नागरिकांनीही येथे गर्दी केली होती. ---५० ते ६० पोलिसांचा फौजफाटा आणि मोठी वाहने या ठिकाणी आणली होती. काही खासगी गाड्यांमध्येही पोलीस विद्यार्थ्यांना भरत होते. सरकार आम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ---यापुढे आंदोलनात पालकहीपोलीस आणि सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीमुळे यापुढे आमचे पालकही या आंदोलनात सहभागी होतील. मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. पुण्यात परीक्षेसाठी मोचार्तून आलेले विद्यार्थी परीक्षा झाल्यावर पुन्हा लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी खासगी बसमधून जात असताना त्यांनाही नांदूरजवळ अडवण्यात आले होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
सिन्नर तालुक्यात पोलिसांनी अडवला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:04 PM
विद्यार्थ्यांंच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी वसतिगृहांमध्ये सुविधा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, आदिवासी मुलींना योग्य प्रकारचे संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता.
ठळक मुद्देसरकार दडपशाही करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास मज्जापोलीस आणि सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीमुळे यापुढे आंदोलनात पालकही