कालिदास देवकर म्हणाले की, मोठ्या लोकसंख्येचे लोणी देवकर गाव असले तरीदेखील, निसर्गदत्त परिसर, दळणवळणाची व्यवस्था, उजनी जलाशय हाकेच्या अंतरावर, तसेच पंचतारांकित औद्योगिक वसाहत याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्यामुळे गावचा विकास करण्यासाठी प्रचंड मोठे संधी क्षेत्र उपलब्ध आहे. गावातील उपेक्षित असलेली वाड्या-वस्त्यावरील रस्त्यांची कामे, शेत पानंद रस्ते, अंगणवाडी बांधकाम, वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची योग्य सुस्थितीत, व्यवस्था देण्याचा मानस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यासाठी कटिबद्ध असणार आहे.
लोणी देवकर गावाच्या हद्दीत तारांकित औद्योगिक वसाहत वाढली पाहिजे. येथील प्रत्येक उद्योगाला आणखी चालना मिळाली पाहिजे यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून सुखसुविधा पुरवल्या जातील.
गावाकडील भूमिपुत्रांना रोजगार हक्काचा एमआयडीसीमध्ये मिळण्यासाठी ठोस प्रयत्न करून, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निकाली काढला जाईल. तसेच गावाअंतर्गत असणाऱ्या वाडीवस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेची बांधकामे, मंदिरांसाठी सभामंडप यासाठी सातत्याने प्रयत्न करून गावच्या विकासासाठी निधी आणला जाईल, असेही कालिदास देवकर यांनी सांगितले.
१७ इंदापूर लोणी देवकर