पुणे : जिल्हा प्रशासनाकडून चारही लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची तयारी केली जात आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात उमेदवारांबरोबर येणाऱ्या प्रतिनिधींवर प्रशासनाची नजर असणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांकडून पास घेवून डमी प्रतिनिधींना दुस-या उमेदवाराचे काम करता येणार नाही, असे अपर जिल्हाधिकारी तथा शिरूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रि या सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची पूर्व तयारी सुरू केली आहे. पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. मतमोजणीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराला एका टेबलवर स्वत:चा एक प्रतिनिधी नियुक्त करता येईल. मात्र, त्यासाठी दिल्या जाणा-या पासचा गैरवापर केला जाऊ शकतो. ही बाब प्रशासनाने विचारात घेतली असून त्यावर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून याबाबत कल्पना दिली आहे.त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी वापरल्या जाणाºया पासचा काळाबाजार करता येणार नाही.रमेश काळे म्हणाले, प्रत्येक उमेदवाराला मतमोजणी केंद्रातील प्रत्येक टेबलवर एक प्रतिनिधी दिला जाणार आहे.या प्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या पासवर संबंधित प्रतिनिधीचे नाव, निवडूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव, विधानसभा मतदार संघाची व टेबलचा क्रमांकाची माहिती दिली जाईल. त्यामुळे संबंधित प्रतिनिधीला आपली जागा सोडून दुसऱ्या मतदार संघात किंवा दुस-या टेबलवर जाता येणार नाही. त्याचप्रमाणे एखादा प्रतिनिधी दुस-याच उमेदवारासाठी काम करत आहे,अशी तक्रार आल्यास किंवा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास संबंधित प्रतिनिधीला बाहेर काढले जाणार आहे. मतमोजणीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींचा खर्च संबंधित उमेदवाराच्या खर्चात धरला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना या प्रतिनिधींवर केलेला खर्चही दाखवावा लागेल.--- शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल असणार आहे. बॅलेट पेपर व सैनिकांच्या मतपत्रिकांची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र टेबल असतील. शिरूरच्या मतमोजणी एकूण ८४ टेबलची व्यवस्था केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी सुमारे ६०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
जिल्हा प्रशासनाची उमेदवारांच्या '' डमी '' प्रतिनिधींवर असणार करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:07 PM
पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे.
ठळक मुद्देअन्यथा संबंधिताना बाहेर काढणार : जिल्हा प्रशासनाचा इशाराजिल्हा प्रशासनाची मतमोजणीच्या कामाची पूर्व तयारी सुरू शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल असणार