लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मोरपेन लॅबोरेटोरिज लिमिटेडने आता नव्या कोट्यवधी डाॅलर्सची अँक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियन्ट्सची (एपीआय) जागतिक बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
कंपनीच्या ‘बल्क ड्रग्ज पोर्टफोलियो’त नव्या माॅलिक्युल्सची भर पडणार असून, त्यात अँटी-डायबेटिक, अँटी-हायपरटेन्सिव्ह, कोलेस्ट्राॅल रिड्यूसर आणि न्यूरो-सायकियाट्रिक माॅलिक्युल्सचा समावेश आहे. या नव्या माॅलिक्युल्सची ग्लोबल पेटंटची मुदत पुढील पाच ते सहा वर्षांत संपणार आहे. हे नवे माॅलिक्युल्स सध्या विकसित करण्यात येत असून, पुढील २४ ते ३६ महिन्यांत टप्प्या-टप्प्याने ते वापरात येतील.
संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुशील सुरी यांनी सांगितले की, जीवनशैली संदर्भातल्या क्षेत्रात येऊ घातलेल्या नव्या उत्पादनांच्या मदतीने आपला पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यासाठी कंपनीने पावले उचलली आहेत. ही उत्पादने तीन ते चार वर्षांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवली जाणार आहेत. कंपनीने यासंदर्भात संशोधनात मोठी गुंतवणूक केली आहे.
कंपनीच्या वाढविण्यात येणाऱ्या क्षमतेमुळे नव्या ४० आणि सध्या अस्तित्वात असलेल्या बल्क ड्रग्जच्या निर्मितीला मदत होणार आहे. यात अँटी-डायबेटिक, अँटी-हायपरटेन्सिव्ह, अँटी-अॅलर्जिक, अँटी-अस्थमॅटिक, कोलेस्ट्राॅल रिड्यूसर, अँटी-व्हायरल, अँटी-कोअँग्युलंट्स, अँटी-सायकोटिक आणि अँटी-डिप्रेसन्ट्स याचा समावेश आहे.