दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीने या संदर्भात तक्रार नोंदविली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्राइवेट लिमिटेड या राणे यांच्या कंपनीने डीएचएफएल कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील २७ कोटी रूपयांची परतफेड झाली नाही. नीलम राणे या कंपनीच्या सह \अर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
यासोबतच नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून 40 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज देखील थकीत आहे. यासंदर्भात देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. या थकीत कर्ज प्रकरणी गुन्हे शाखेकडून नीलम आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध ही नोटीस बजावण्यात आली आहे.
कोट
केंद्र सरकारकडून एक पत्र राज्याच्या गृह विभागाला प्राप्त झाले होते. त्यानंतर ते पत्र आम्ही पुणे पोलिसांना पुढील कार्यवाहीसाठी दिले.
दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री