शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

यू ट्यूब पाहून मोटारी चोरणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:01 AM

यू ट्यूबवरील गाडी चोरण्याचा व्हिडीओ पाहून कोल्हापूर येथून आलिशान मोटारी चोरणाऱ्याला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड उत्तर विभागाने पकडले आहे़

पुणे : यू ट्यूबवरील गाडी चोरण्याचा व्हिडीओ पाहून कोल्हापूर येथून आलिशान मोटारी चोरणाऱ्याला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड उत्तर विभागाने पकडले आहे़ त्याच्याकडून ३ मोटारी व ५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.रेवण सोनटक्के (वय २०, रा़ महंमदवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा स्कॉड उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व त्यांचे पथकातील कर्मचारी बुधवारी खडकी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना मुळा रोड येथे रस्त्याच्या कडेला एक आलिशान मोटार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळले. त्या वेळी गाडीत बसलेल्याकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला़ त्यामुळे त्याच्याकडे मोटारीची चौकशी केल्यावर ती चोरीची असल्याचे आढळून आले़ अधिक चौकशीत त्याने ही मोटार कोल्हापूर येथील गॅरेजमधून चोरली असल्याचे सांगितले. कोल्हापूर व सांगलीतून २ मोटारी चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून ३ चारचाकी व ५ मोबाईल जप्त केले. ही कारवाई पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गणेश पवार, कर्मचारी नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर, राजू मचे, धर्मराज आवटे, दीपक भुजबळ व इतर कर्मचारी याच्या पथकाने केली.>‘गाडी चुराने का तरीका’रेवण सोनटक्के याने यू ट्यूबवर ‘गाडी चुराने का तरीका’ची व्हिडिओ क्लिप पाहिली होती़ त्यात दाखविल्याप्रमाणे तो चोºया करीत होता़ गाड्या गॅरेजमध्ये दिल्यानंतर मेकॅनिक गाडीची किल्ली गॅरेजमध्ये की-बोर्डवर ठेवत होता. त्या वेळी तेथे गाडी दुरुस्तीच्या बहाण्याने जाऊन तो किल्ली चोरायचा. त्यानंतर रात्री त्या किल्लीच्या मदतीने गाडी चोरून निघून जायचा. त्याने चोरलेल्या गाड्या स्वत: फिरण्यासाठी वापरल्या. तर, आलिशान मोटारीचा वापर त्याने हडपसर-सोलापूर वाहतुकीसाठी केला. अशीच आलिशान मोटार नगर रोडवर शिरूरजवळ अपघात झाल्याने सोडून दिली होती. तर, त्याने यापूर्वी शिवाजीनगर व बस स्थानक परिसरात मोबाईलचोरी केली होती. त्याला आॅगस्ट २०१७मध्ये मोबाईलचोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती़

टॅग्स :Arrestअटक