शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

पालिका व ठेकेदाराकडून होतेय चालकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2016 2:36 AM

पालिकेची कचरा वाहतूक करणारी वाहने तसेच अन्य गाड्यांवरील चालकांची गेली अनेक वर्ष आर्थिक पिळवणूक सुरू आहे. महापालिका तसेच ठेकेदार याला जबाबदार असून

पुणे : पालिकेची कचरा वाहतूक करणारी वाहने तसेच अन्य गाड्यांवरील चालकांची गेली अनेक वर्ष आर्थिक पिळवणूक सुरू आहे. महापालिका तसेच ठेकेदार याला जबाबदार असून, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र कामगार मंचाने कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यात पीएमपी ही प्रवासी सेवाही विनाकारण भरडली जात आहे.महापालिकेला त्यांच्या वाहनांसाठी विशेषत: कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी सातत्याने चालक लागतात. दोन पद्धतींनी महापालिका प्रशासन ही गरज भागवते. पीएमपी या प्रवासी सेवेकडून रोज ८० चालक घेण्यात येतात. त्यांच्या वेतनासाठी पालिकेने प्रतिचालक, प्रतिदिन १ हजार २०० रुपये पीएमपीला देणे अपेक्षित आहे. मागील ८ वर्षांत पालिका प्रशासनाने या वेतनापोटी पीएमपीला काहीही पैसे दिलेले नाहीत. ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अशी थकीत आहे. चालकांच्या बदल्यात पालिका पीएमपीची काही लहान वाहने आहेत त्यांना रोज इंधन देते. अशी फक्त १० ते १२ वाहने आहेत. त्यांचे मिळून पीएमपीने पालिकेला फक्त ७० लाख रुपये देणे आहे. म्हणजे, ७० लाख रुपयांच्या बदल्यात पालिकेने पीएमपीचे तब्बल ५ कोटी रुपये थकवले आहेत.चालक घेण्याची पालिका प्रशासनाची दुसरी पद्धत म्हणजे ठेकेदाराकडून चालक घेणे. साधारण २७५ चालक ठेकेदाराकडून घेतले जातात. पालिका त्यासाठी ठेकेदाराला प्रतिचालक, प्रतिदिन ५०२ रुपये देते. ठेकेदाराकडून मात्र चालकांना फक्त ३३० रुपये दिले जातात, असे महाराष्ट्र कामगार मंचचे दिलीप मोहिते यांचे म्हणणे आहे. कंत्राटी कामगारांसाठी अनेक नियम केलेले आहेत. त्यासाठी स्वतंत्र कायदा आहे; मात्र ठेकेदाराकडून या कायद्यातील एकाही कलमाची अंमलबजावणी केली जात नाही. रजा, सुट्या यांबाबतचे कसलेही नियम त्यांना लागू केले जात नाहीत. त्यांचा भविष्यनिर्वाह निधी तसेच अन्य फायदेही त्यांना दिले जात नाहीत. (प्रतिनिधी)