सुषमा नेहरकर-शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली. या रुग्णवाढीचा बहुतेक खासगी रुग्णालय गैरफायदा घेऊन रुग्णांची लूट सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत ग्रामीण भागातील २ हजार ६१ बिलांची तपासणी केली. त्यात तब्बल १ कोटी २ लाख ४१ हजार रुपयांचे बिल लेखा परीक्षण समितीने कमी केले. तरी देखील कोरोना रुग्णांना तब्बल २१ कोटी २३ लाख २९ हजार रुपयांचे बिल भरावे लागले आहे.
गतवर्षी कोरोनाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांना लुटणे सुरू केले. अनेक रुग्णालयाकडून मनमानी पद्धतीने बिल आकारणी सुरू केले. यासाठी शासनाच्या आदेशानुसार बिलांची तपासणी करण्यासाठी लेखा परीक्षण समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बिलांच्या तपासणी करून रक्कमा कमी केल्या. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या आणि खासगी कोविड हाॅस्पिटलची संख्या देखील मोठ्याप्रमाणात वाढली
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत दिवसाला तब्बल १० हजारांच्या घरात कोरोना रुग्ण सापडले. ग्रामीण भागात देखील दिवसाला अडीच ते तीन हजार रुग्ण सापडत आहेत. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा आणि बेड्स मिळणे देखील कठीण झाले. या सर्व गैरसोयीचा फायदा घेत अनेक खासगी हाॅस्पिटलकडून रुग्णांची लुट सुरू केल्याचे लेखा परीक्षण समितीच्या तपासणीत स्पष्ट झाले.
------
जिल्ह्यात तालुकानिहाय तपासणी झालेल्या बिलांची संख्या व कमी झालेल्या बिलांची रक्कम
तालुका बिलांची संख्या कमी झालेली रक्कम
मुळशी १७३ ११२९२४
बारामती ८३ ८१५५०
शिरूर ३१७ ४६२८०
इंदापूर १३० १०६२५१
मावळ ८०४ ८०७२७९२
आंबेगाव ३१५ २७०२१०
खेड १४ ७४८००
दौंड ५९ १२५६८१०
जुन्नर १०६ १५८४००
भोर ६० ६१०५२
एकूण २०६१ १०२४१०६९