शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

राशीच्या खड्यांद्वारे अनेकांना गंडा

By admin | Published: October 26, 2016 5:49 AM

ग्रहपीडा झालीय, सुखी जीवन जगायचे, व्यवसायात वृद्धी करायची, मग राशीचा खडा घाला आणि बघा चमत्कार असे म्हणत दोन युवकांनी पिंपरी-चिंचवडमधील अनेक

तळेगाव दाभाडे : ग्रहपीडा झालीय, सुखी जीवन जगायचे, व्यवसायात वृद्धी करायची, मग राशीचा खडा घाला आणि बघा चमत्कार असे म्हणत दोन युवकांनी पिंपरी-चिंचवडमधील अनेक सुशिक्षित नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकाराबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल होत नसल्याने हा प्रकार वाढत चालला आहे. शहर परिसरातील महाविद्यालयात दोन युवक फिरत आहेत. त्यांच्याजवळ विविध राशींचे खडे आहेत. हे खडे प्रत्येकी दोन ते चार हजार रुपयांना विकतात. ते खरेदी करण्यासाठी हे युवक एक प्रात्यक्षिक दाखवितात. त्यांच्याकडे एक वाटी आहे. त्यात खडे ठेवले जातात. राशीला अनुकूल असणारा खडा वाटीमध्ये फिरतो. तसेच इतर खडे वाटीमध्ये स्थिर राहतात. त्यामुळे हा खडा आपल्या राशीसाठी योग्य आहे, असे वाटल्याने अनेक जण या खड्याची खरेदी करत आहेत. निगडी प्राधिकरण परिसरात असणाऱ्या एका महाविद्यालयात हे तरुण खडा विकण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांच्याकडे चार ग्राहकांनी चौकशी केली. एका ग्राहकाला त्यांनी गुरूचा खडा योग्य असल्याचे सांगितले. दुसऱ्या ग्राहकाला त्यांनी दोन खडे घालण्याची गरज असल्याचे सांगितले. या युवकांनी अशाच प्रकारे अनेक जणांना गंडा घातला आहे. अशिक्षित लोकांना टार्गेट करून अंधश्रद्धा पसरविली जाते. पण, हे युवक बोलण्याची कसब दाखवून सुशिक्षितांना भुरळ पाडत आहेत. अनेक जण त्यांच्या करामतीला फसले आहेत. (वार्ताहर)अन् युवक झाले निरुत्तरएका महाविद्यालयात युवक खडे विकण्यासाठी गेले. तेथील अनेक शिक्षकांनी खड्यांची खरेदी केली. हाच धागा पकडत त्याच शाळेतील एका शिक्षकाकडे गेले. त्यांनी खडा आणि प्रात्यक्षिक पाहिले. खडे विकणाऱ्या युवकांना मला गृहदक्षा नाही, मला दुसरी कुठली व्यथा नाही. पण, मला व्यसन आहे, ते सोडण्यासाठी या खड्याचा वापर होईल का, हे विचारले असता, युवक निरुत्तर झाले आणि त्यांनी त्या महाविद्यालयातून काढता पाय घेतला.