राजानंद मोरेपुणे : मागील वर्षभरात प्रवासी संख्या वाढविणे, ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करणे, अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) केलेले प्रयत्न फोल ठरले आहेत. मागील आर्थिक वर्षात पीएमपीने आतापर्यंतच्या तोट्याचा उच्चांक गाठला आहे. ‘पीएमपी’ची २०१८-१९ या वर्षातील संचलन तुट म्हणजे आर्थिक तोटा २०४ कोटी रुपयांवरून २४४ कोटींवर पोहचला आहे. प्रवासी संख्येत सुमारे ५५ हजारांनी घट झाली असून वर्षभरातील बसची धाव तब्बल ८५ लाख किलोमीटरने कमी झाली आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढीनेही पीएमपीचे कंबरडे मोडल्याचे स्पष्ट झाले आहे.‘पीएमपी’ची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय होत चालली असल्याचे वाढलेल्या तोट्यावरून स्पष्ट झाले आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३ पासूनची स्थिती पाहिल्यास तोट्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१७-१८ हे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. या वर्षी पीएमपीचा तोटा ६ कोटींनी कमी झाला होता. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ठेकेदारांवर केलेली कारवाई, मार्गावर वाढलेल्या बस, वाढलेले प्रवासी तसेच बसची वाढलेली धावही त्यास कारणीभुत होती. याउलट २०१८-१९ मध्ये सर्वच आघाड्यांवर पीएमपीची पीछेहाट झाली आहे. आर्थिक २०१७-१८ मध्ये दररोज सरासरी १४२५ बस मार्गावर होत्या. मागील वर्षी हा आकडा १३७३ पर्यंत खाली आला आहे. प्रशासनला प्रवासी संख्या वाढविण्यातही अपयश आले आहे. मागील वर्षी सुमारे १० लाख ३४ हजार प्रवाशांना दररोज प्रवास केला. २०१७-१८ व २०१६-१७ च्या तुलनेत ही संख्या अनुक्रमे ५५ हजार व ६५ हजारांनी कमी आहे. मार्गावरील बससंख्या घटल्याने तसेच ब्रेकडाऊन कमी न झाल्याने दैनंदिन किलोमीटर सुमारे ८५ लाखांनी कमी झाले आहे. २०१८-१९ मध्ये सर्व बस सुमारे १० कोटी ३६ लाख किलोमीटर धावल्या. त्यानुसार एक बस दररोज सुमारे २०६ किलोमीटर धावली. तर २०१७-१८ मध्ये ही धाव सुमारे २१५ किलोमीटर एवढी होती. प्रामुख्याने भाडेतत्वावरील बसची धाव कमी झाल्याचे पीएमपीतील सुत्रांनी सांगितले. परिणामी, प्रवासी संख्येवर त्याचा परिणाम होऊन तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर कमी झाले. -------------------पीएमपीच्या ताफ्यात मागील वर्षभरात २५ इलेक्ट्रिक, ३३ तेजस्विनी आणि २०० हून अधिक मिडी बस दाखल झाल्या. पण त्यानंतर प्रत्यक्ष मार्गावरील बसची संख्या वाढली आहे. २०१७-१८ मध्ये पीएमपीच्या मालकीच्या ७९४ बस मार्गावर होत्या. त्यामध्ये मागील वर्षी केवळ ३ ने वाढ झाली आहे. नवीन बस आल्यामुळे अनेक जुन्या बस ताफ्यातून बाहेर काढण्यात आल्या. तर भाडेतत्वावरील ५६ बस कमी झाल्या. २०१७-१८ मध्ये ६३१ बस मार्गावर होत्या. पण देखभाल-दुरूस्ती अभावी अनेक बस मार्गावर येत नसल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.
इंधन दरवाढीने ३३ कोटींचा बोजामागील वर्षभरात इंधनदरवाढीनेही पीएमपीचे कंबरडे मोडले. वर्षात सीएनजी व डिझेलच्या दरात सरासरी प्रत्येकी ८ रुपयाने वाढ झाली. एकाच वर्षात पहिल्यांदाच एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे इंधन खर्च वाढून सुमारे १५० कोटींवर पोहचला. २०१७-१८ च्या तुलनेत या खर्चात ३३ कोटींची वाढ झाली. २०१७-१८ मध्ये सीएनजी व डिझेलचे दर अनुक्रमे ४६ रुपये प्रति किलो व ६३ रुपये प्रति लिटर एवढे होते.तुकाराम मुंढे यांनी ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे त्यांना द्याव्या लागणाºया बिलामध्ये कपात करण्यात आली होती. परिणामी २०१७-१८ मध्ये तोटा कमी झाल्याचे दिसते. ही कारवाई मागील वर्षभरात काही प्रमाणात कमी झाली असली तरी ठेकेदारांकडील मार्गावरील बसही कमी होत्या. त्यामुळे त्यांचे बील कमी झाले. त्यामुळे काही प्रमाणात तोटा भरून निघाला. अन्यथा एकुण २४४ कोटी रुपयांच्या तोट्यात आणखी काही कोटींची भर पडली असती, असे सुत्रांनी सांगितले.
मागील तीन वर्षातील पीएमपीची स्थिती २०१६-१७ २०१७-१८ २०१८-१९प्रवासी संख्या १०,७९,२२३ १०,८९,२०८ १०,३४,००००बसची धाव (किलोमीटर) १०,९३,३०,१९७ ११,२१,३०,१७९ १०,३६,०००००मार्गावरील बस १३८३ १४२५ १३७३---------------------------------------------------------------------आर्थिक वर्ष २०१२-२०१८ मधील जमा खर्चवर्ष प्राप्त उत्पन्न खर्च तोटा२०१२-१३ ५३२,६१,९७,६६७ ५९५,२३,५०,२८९ ६२,६१,५२,६२२२०१३-१४ ६०२,६२,५३,२८० ७०२,०३,२८,८७९ ९९,४०,७५,५९९२०१४-१५ ७०७,३७,९३,७३३ ८७५,०६,५९,३८४ १६७,६८,६५,६५१२०१५-१६ ७७६,७५,२४,४१२ ९२८,५५,७८,७८४ १५१,८०,५४,३७२२०१६-१७ ७२०९३०५६८० ९३१३७५१०४८ २१०,४४,४५,३६८२०१७-१८ ६५८५१८०९७३ ८६३१३९५६०१ २०४,६२,१४,६२८२०१८-१९ -- -- २४४,००,००,००० (सुमारे)-------------------------------------------------------