शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

नेत्यांच्या दुर्लक्षामुळे शहर काँग्रेसचे नुकसान

By admin | Published: December 29, 2016 3:16 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजू लागले आहेत. काँगे्रसच्या विद्यमान सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला खिंडार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजू लागले आहेत. काँगे्रसच्या विद्यमान सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला खिंडार पडले आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना ताकत न दिल्याने, लक्ष न दिल्याने गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. शहराच्या राजकारणात, विकासात काँग्रेसचे योगदान वादातीत आहे. दिवंगत सांस्कृतिक कार्यमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शहरविकासावर आपला ठसा उमटविला. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चिंचवड प्रेक्षागृह आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्यामुळेच शहरात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतरही प्रा. मोरेंमुळेच काँग्रेसचे महापालिकेतील वर्चस्व, ताकत कायम ठेवली होती. सत्तेत समान भागीदार असत. मात्र, सरांच्या निधनानंतर काँग्रेसची ताकत विखुरली गेली. त्यानंतर काँग्रेसला खिळखिळे करण्याचे प्रयत्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आले. २००२च्या निवडणूकीत ३२ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यानंतर २००७ च्या निवडणूकीत १९ जागा आणि २०१२ च्या निवडणूकीत १४ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. गौतम चाबुकस्वार शिवसेनेत गेल्याने काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ १३वर आले. प्रा. मोरेंचे वारसदार माजी शहराध्यक्ष हनुमंत गावडे यांच्यासह ११ जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले, तर तत्कालीन शहराध्यक्ष श्रीरंग बारणे शिवसेनेत गेले. त्यानंतर भाऊसाहेब भोईर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची सूत्रे आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या जागावाटपात २००९च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला. पक्षाची उमेदवारी भोईरांना देऊन अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीने निवडून आणले. पवारनीतीमुळे भोईरांचा पराभव झाला. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही केवळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा गड म्हणून पिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरण समितीही निवडली गेली नाही. विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्याही नियुक्त्या न केल्यानंतर भोईर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सचिन साठे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली. मात्र, भोईर आणि साठे यांच्या समर्थकांत अधूनमधून धुसफूस सुरू असते. वर्चस्ववादाची लढाई सुरूच होती. पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही नगरसेवक राष्ट्रवादीत येणार असल्याचे सूचित केले होते. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते. त्यामुळे भोईर गटाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.(प्रतिनिधी)भोईरांचे पवारांशी गुफ्तगू१पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पवार यांनी भोईरांशी गुफ्तगू केले. त्यामुळे महिनाभरात १० नगरसेवकांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा होती. एक एक करून विद्यमान आणि माजी नगरसेवक आणि पदाधिकारी इतर पक्षांत जात आहेत. पदाधिकारी पक्ष सोडून का जाताहेत, हेही पक्षश्रेष्ठींनी समजून घ्यायला हवे. मात्र, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून लक्ष दिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील किंवा देशातील काँग्रेसच्या नेत्यांचेही शहराकडे दुर्लक्ष झाले आहे. याचाच फायदा पवारांनी घेतला. गटबाजीलाही उधाण२१५ वर्षांत शहरातील राजकारणात बदल झाला आहे. पक्षापेक्षा व्यक्तिगत राजकारण करण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पूर्वी या शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे असे प्रमुख गट मानले जायचे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतर साहेब, दादा आणि सर असे तीन गट मानले जायचे. मात्र, पक्ष आणि नेत्यांच्या नावावर चालणारे राजकारण संपले आहे. स्थानिक नेत्यांच्या नावाने गटबाजी सुरू झाली आहे. अशाच प्रकारचे गट काँग्रेस आणि इतर पक्षांतही निर्माण झाले आहेत. ‘लोकमत’मध्ये वृत्त३पुणे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले. या निकालावर फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. त्यावरूनच आघाडी होणार की नाही, हे निश्चित आहे. काँग्रेस फोडण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने व्यूहरचनाकेली आहे. पुढील महिना काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानला जात आहे, याबाबत लोकमतने मागील आठवड्यात काँग्रेसला धोक्याची घंटा हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते, हे वृत्त खरे ठरले आहे.