गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By Admin | Published: April 16, 2017 04:40 AM2017-04-16T04:40:38+5:302017-04-16T04:40:38+5:30

कळंबोली सर्कलगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली

Loss of millions of liters of water due to leakage | गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

googlenewsNext

कळंबोली : कळंबोली सर्कलगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली पाण्याचे डोह साचले आहे. एकीकडे पाणीटंचाई जाणवत असताना दुसरीकडे अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार दुरुस्ती करूनही गळती होत असल्याने एमजेपीही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून भोकरपाडा ते जेएनपीटी आणि कळंबोली या दरम्यान ३५ वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. आजघडीला ती अतिशय जुनाट आणि जर्जर झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती लागून कारंजे उडताना दिसतात. जवळपास २५ टक्के पाण्याची गळती होत आहे. कळंबोली स्टील मार्केट परिसरात तर वाहनचालक, झोपडपट्टीवासी जाणूनबुजून जलवाहिन्या फोडत असल्याच्या तक्र ारी येत आहेत.
द्रुतगती महामार्गालगत असलेल्या एमजेपीच्या जलवाहिनीला गेल्या अनेक वर्षांपासून फुटीचे ग्रहण लागले आहे. येथून मोठ्या प्रमाणात पाणी पुलाखालील खड्ड्यात पडते. त्या ठिकाणी गेल्यानंतर कडक उन्हाळ्यातही पावसाळा आहे की, असा भास होतो. सध्या पनवेल शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे सिडको वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती असताना कळंबोली पुलाखाली लाखो लिटर पाणी साचलेले आहे. त्याचा वापर कशासाठीही करता येत नसल्याची खंत शंकर वीरकर या रहिवाशांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छ केलेल्या पिण्याच्या पाण्याचा अशा प्रकारे अपव्यय होऊ देणे अतिशय चुकीची बाब असल्याचे मत खांदा वसाहतीतील सविता मिसाळ यांनी व्यक्त केले.

Web Title: Loss of millions of liters of water due to leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.