- डॉ. नितीन सावगावे, सांगली
=====
माझा इलेक्ट्रिक कन्स्लटिंगचा व्यवसाय आहे. पत्नीच्या निधनानंतर मी एकटा पडलो होतो. त्यामुळे संस्थेत नाव नोंदविले. आसावरी कुलकर्णी यांच्याशी ओळख झाल्यावर आम्ही दोघे एकत्र राहू लागलो. आम्ही दोघेही ७० वर्षाचे आहोत. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आणि आदर आहे. आम्ही दोघेही कोरोना पॉझिटीव्ह होतो. आताही दहा बारा दिवस मी रुग्णालयात होतो. पण, हिने माझी सर्व शुश्रृषा केली. डबा देण्यापासून उपचारांपर्यंत सर्व काळजी घेतली. आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत. आमच्या दोघांच्याही मुलांनी आम्हाला कायमच पूर्ण पाठिंबा दिलेला आहे.
- अनिल यार्दी, बिबवेवाडी
=====
‘ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळ’ संस्थेमधून आजवर शेकडो ज्येष्ठांना आपला प्रेमाचा जोडीदार मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ बाबत निर्णय दिला. ज्येष्ठांसाठी हा उत्तम पर्याय असल्याने जागरुकता सुरु केली. ज्येष्ठांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकत्र येण्यास सुरुवात केली. या प्रयत्नांमधून अनेक जोडपी एकत्र ‘नांदत’ आहेत.
- माधव दामले, संस्थाप्रमुख