शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

उत्पन्न कमी अन् खर्च जास्त; कोरोनाने शिकविले ‘कॉस्टकटिंग’ ( डमी 904)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:08 AM

पुणे : सध्याच्या कोरोना काळात मध्यमवर्गीयांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषावर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड... पगारात ...

पुणे : सध्याच्या कोरोना काळात मध्यमवर्गीयांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषावर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड... पगारात झालेली कपात... सातत्याने वाढती महागाई... पेट्रोलचे गगनाला भिडलेले दर.., या कारणांमुळे बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबांवर मासिक खर्चात कपात करण्याची वेळ आली आहे. अगदी जीवनाश्यक वस्तूंबाबतच्या काटकसरीपासून कटिंगपर्यंत अनेकांनी कॉस्टकटिंगचा मार्ग पत्करला आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणींचे मासिक अंदाजपत्रक कोलमडले आहे. कुटुंबात पाच ते सहा माणसे; मात्र कमावणारे केवळ दोघेचं. यातच एकाची नोकरी गेलेली तर, दुसऱ्याच्या पगारात अद्यापही कपात सुरू आहे. पैसा कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे याचा ताळमेळ बसवणे गृहिणींना अवघड जात आहे. मुलांच्या शाळेचे शुल्क, ऑनलाइन शिक्षणाचा वाढता खर्च, यामुळे आधीच कुटुंब मेटाकुटीला आली आहेत. त्यामुळे बहुतांश कुटुंबांनी खर्चाबाबत आता हात आखडते घेण्यास सुरुवात केली आहे. अगदी दूध, भाज्या, किराणामालपासून ते कटिंग, मॉल खरेदी, हॉटेलवर होणारी उधळपट्टीपर्यंत कुटुंबांनी खर्चात कपात केली असल्याचे गृहिणींकडून सांगितले जात आहे.

-----------------------

मासिक अंदाजपत्रकाला जवळपास ५ हजारांची कात्री

दर महिन्याला कुटुंबातील माणसांप्रमाणे घरात किती सामान लागते, याची यादी करण्याबरोबरच मुलांच्या शाळेचा खर्च, औषधपाणी या सर्व गोष्टी गृहीत धरून एक विशिष्ट रक्कम बाजूला ठेवली जाते. एका कुटुंबातील पाच व्यक्तींनुसार गृहिणींचे मासिक अंदाजपत्रक हे १५ ते २० हजारांच्या आसपास असते. यात व्यक्तींनुसार कमी अधिक फरक पडू शकतो; पण कोरोना काळात या अंदाजपत्रकामध्ये जवळपास पाच हजार रुपयांपर्यंत कपात करण्याची वेळ आली आहे. खर्च कमी कसा करता येईल याचा विचार कुटुंबांकडून केला जात आहे.

-----------------------------

कुठे केले ‘कॉस्टकटिंग’?

* दोन भाज्यांऐवजी एकच भाजी

* एकत्रितपणे सामान भरण्याऐवजी गरजेनुसार सामान आणण्यावर भर

* शॉपिंग आणि हॉटेलिंग

* दाढी आणि कटिंग

* ब्युटीपार्लर

* कामवाली बाई

-------------------------

हॉटेलिंग किंवा एखादा नवीन पदार्थ करून पाहायचा असल्यास लागणाऱ्या किरकोळ गोष्टींवर अनावश्यक खर्च केला जायचा. पण या गोष्टी कमी केल्यामुळे किमान १००० ते १५०० रुपयांची बचत झाली. आम्ही ते पैसे औषधपाण्यासाठी आता वेगळे ठेवतो. यातच मुलांचा चित्रपटगृहांमध्ये जाऊन किमान १५०० रुपये खर्च व्हायचा; पण चित्रपटगृह बंद झाल्याने तो खर्च वाचला आहे. सध्यातरी बचत करण्याशिवाय गत्यंतर नाही.

- गौरी हडके, गृहिणी

------------------------------

गेल्या वर्षी नवऱ्याची नोकरी गेली आणि कुटुंबावर कुऱ्हाड कोसळली. आम्ही दोघे कमवत असलो तरी माझा पगार घर चालवायला पुरेसा नव्हता. त्यामुळे घर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडला. यातच सासऱ्यांना कोरोना झाला. त्यांच्या औषधपाण्यासाठी बचत केलेली रक्कम खर्च करावी लागली. तेव्हा मग आम्ही सर्वांनी एकत्र बसून काय करता येईल याचा विचार केला. अंदाजपत्रकातून अनावश्यक गोष्टींवरचा खर्च कमी केला. मुलाचे केस घरीच कापू लागलो. धुणी-भांड्याला असलेली बाई काढून टाकली, सगळे मिळून काम करण्याचे ठरले.

- स्मिता महाडिक, नोकरदार

---------------------------------