शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले

By admin | Published: May 29, 2017 2:19 AM

इंदापूर तालुक्यात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले आहे. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ५४ फाटा, लासुर्णेपाठोपाठ

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : इंदापूर तालुक्यात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले आहे. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ५४ फाटा, लासुर्णेपाठोपाठ रविवारी (दि. २८) ३६ फाट्यावरील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक ३६वर अवलंबून असणाऱ्या सणसर, हिंगणेवाडी, सपकळवाडी, कुरवली आदी भागातील शेतकऱ्यांनी रविवारी सणसर पाटबंधारे वसाहत येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे बारामती- इंदापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा’ आदी घोषणांनी या वेळी सणसर परिसर दुुमदुमला. चेहरे पाहून पाणी दिले जाते, तीन महिन्यांपासून सोडण्यात आलेले पाणी नेमके कुठे गेले, बारमाही पाणीपट्टी भरणारा शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहतो. मात्र, सायफनद्वारे ठराविक जणांना मुबलक पाणी मिळते. त्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी मदत करतात, अशा तक्रारी या वेळी शेतकऱ्यांनी मांडल्या. दिलीप पांढरे, दीपक कदम, नंदकुमार सपकळ आदींनी या वेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या वेळी आंदोलनात आबासाहेब निंबाळकर, शिवाजी सपकळ, किरण गायकवाड, संजय सपकळ, रवींद्र कदम, दत्तात्रय सपकळ आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर येथील आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, पाणी सोडण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. दोन तासांहून अधिक वेळ शेतकरी या ठिकाणी बसून होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत...या वेळी छत्रपती कारखान्याचे संचालक प्रदीप निंबाळकर यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारला. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या आवर्तनाची केवळ सणसर परिसरात अंमलबजावणी होत नाही. या ठीकाणी उन्हाळ्यातील पहिले आवर्तन अद्याप सुरु आहे. तेदेखील पाणी मिळाले नाही. याच कालव्यावर इतरत्र मात्र, दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु आहे. हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कार्यकारी अभियंता कार्यालयदेखील शेतकऱ्यांना अधिकारी सहज उपलब्ध होतील, अशा ठिकाणी असावे. त्यांचे पुणे येथील कार्यालय शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी आहे.धरण १०० टक्के भरूनदेखील शेतकऱ्यांवर ही वेळ आली. नियोजन करता येत नसल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया निंबाळकर यांनी व्यक्त केली.या भागात शेतकरी आत्महत्या करतील...नीरा डावा कालव्याच्या पाण्यापासून ३६ फाट्यावरील शेतकऱ्यांना सातत्याने वंचित ठेवले जात आहे. पाण्याअभावी शेती जळून जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास या भागातदेखील शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केली.जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार करणार...शेतकरी पाणीपट्टी भरतात. पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पाणी न मिळाल्याने आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत इंदापूरच्या वतीने जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती इंदापूर तालुका संघटक प्रशांत साळुंके , सणसरचे संघटक संजय निंबाळकर यांनी दिली.