पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरु झाली आहे. दक्षिणेत आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता कमी झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याचा जोर वाढू लागला आहे. त्याचा परिणाम विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणाच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे.
पुढील तीन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. १० डिसेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १०.४, लोहगाव १३.७, जळगाव १३, कोल्हापूर १६.९, महाबळेश्वर १३.९, मालेगाव १३, नाशिक १०.६, सांगली १४.४, सातारा १३, सोलापूर १३.५, मुंबई २२.४, सातांक्रुझ १८.४, रत्नागिरी २०.२, पणजी १९.९, डहाणु १८.८, औरंगाबाद १२.२, परभणी १०.८, नांदेड १३.५, अकोला १२.७, अमरावती १५.७, बुलढाणा १४.२, ब्रम्हपुरी १३.६, चंद्रपूर १८.२, गोंदिया १२.८. नागपूर १२.९, वाशिम १२.८. वर्धा १२.८.