पुणे : दक्षिणेत एकीकडे चक्रीवादळ आले असतानाच राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त केली जात असतानाच सोमवारी सकाळी पुण्यात या हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमानाची नोंद झाली. सोमवारी सकाळी पुण्यात ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते.राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे.रविवारी सकाळी पुण्यात १२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. वेधशाळेने पुण्यातील पुढील काही दिवसांचे तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पुण्यातील किमान तापमानात एकाच रात्रीत ४.२ अंशाने घटून ते सोमवारी ८.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पावसाळ्यात जसा पाऊस हवामान विभागाला हुलकावणी देत असतो. तसाच आता थंडी हवामान ही वेधशाळेला हुलकावणी देऊ लागले आहे. हवामानात इतकी अस्थिरता आली असल्याने वेधशाळेचा अंदाजही चुकू लागला आहे. सोमवारी सकाळी नाशिक येथे ८.५, अहमदनगर ८.७, जळगाव ८.४, मुंबई १९, बुलढाणा ११.६, मालेगाव १०, गोंदिया ११.५, सातारा ११.४, सांगली ११.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.
पुण्यात हंगामातील सर्वात नीचांकी किमान तापमान ८.३ अंश सेल्सिअसची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 11:41 AM
राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे.रविवारी सकाळी पुण्यात १२़५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.
ठळक मुद्देवेधशाळेने पुण्यातील पुढील काही दिवसांचे तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता