शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

पावणेतीन कोटी गरिबांना स्वयंपाकाचा गॅस; उत्तर प्रदेश टॉपवर, ईशान्य भारत खूपच मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 4:43 AM

चूलमुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत अवघ्या दीड वर्षातच २ कोटी ७० लाख स्वयंपाक गॅस जोड वितरित करण्यात आले. देशात सर्वाधिक स्वयंपाक जोड उत्तर प्रदेशांत वितरित करण्यात आले असून, महाराष्ट्राचा क्रमांक आठवा लागतो.

विशाल शिर्केपुणे : चूलमुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत अवघ्या दीड वर्षातच २ कोटी ७० लाख स्वयंपाक गॅस जोड वितरित करण्यात आले. देशात सर्वाधिक स्वयंपाक जोड उत्तर प्रदेशांत वितरित करण्यात आले असून, महाराष्ट्राचा क्रमांक आठवा लागतो.प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाक गॅस वितरण कार्यक्रम २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार तीन वर्षांत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५ कोटी एलपीजी गॅस जोड बसविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. देशातील ग्रामीण भागात लाकूड, गोवºया, करोसिन आणि बायोमासचा उपयोग स्वयंपाकासाठी केला जातो. त्यासाठी जंगलतोड होतेच; शिवाय धुरामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ही योजना हाती घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाने माहिती अधिकारात दिली आहे.या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील प्रौढ महिलेला सोळाशे रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षांत अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ४९९ कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे. त्यातून २ कोटी ३१ हजार ८६६ गॅसजोड वितरित करण्यात आले. चालू आर्थिक वर्षांतही अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी १ हजार २८९ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यातून ७६ लाख ५ हजार ५२४ गॅसजोड वितरित करण्यात आले. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे.ईशान्य भारतातील मणिपूर ८ हजार ३२४, मेघालय ६ हजार ४०४, मिझोरम आणि सिक्कीम शून्य, नागालँड ३ हजार १२४ आणि त्रिपुरा येथे ५०१ गॅसजोडण्या देण्यात आल्या आहेत. तेलंगणा येथील संख्यादेखील केवळ ४० गॅसजोड इतकी नीचांकी असून, गोव्यात ९७४ व दिल्लीत ४७७ गॅसजोडण्या देण्यात आल्या आहेत.गॅसजोड वितरण संख्याराज्य २०१६-१७ २०१७-१८ जोडणीची अंतिम संख्याउत्तर प्रदेश ५५,३१,१५९ ४,६९,८२७ ५९,७३,६८९पश्चिम बंगाल २५,२०,४७९ १८,०२,७७० ४१,३७,५९३बिहार २४,७६,९५३ १३,७०,७८३ ३६,९७,१२२मध्य प्रदेश २२,३९,८२१ ४,१५,२३४ २६,३७,१२६राजस्थान १७,२२,६९४ ४,५५,२३० २१,६३,१८९ओडिशा १०,११,९५५ ५,१२,०९९ १४,९५,६४२छत्तीसगड ११,०५,४४१ ३,९०,२९८ १४,४१,३५२महाराष्ट्र ८,५८,८०८ ५,३८,१२४ १३,५९,८७१गुजरात ७,५२,३५४ ३,२३,०६३ १०,५३,७३८झारखंड ५,३६,९१२ २,४४,४६९ ७,४९,३१२

टॅग्स :Governmentसरकार