LPG Refill Booking Portability: केंद्र सरकारने करोडो एलपीजी ग्राहकांसाठी (LPG customers) मोठा दिलासा दिला आहे. पायलट प्रोजेक्टमध्ये पुण्यासह पाच शहरांचे ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार गॅस रिफिलिंगसाठी (LPG Refill)डिस्ट्रीब्युटर (LPG Distributor) निवडू शकणार आहेत. आता ही प्रक्रिया कशी असेल? फोन केल्यावर सिलिंडर बुक होतो, मग कसे करायचे असा प्रश्न साऱ्यांना पडला असेल. हा डिस्ट्रीब्युटर कसा निवडायचा याची माहिती आता देण्यात आली आहे. जाणून घ्या... (LPG Refill Booking Portability, how to book gas cylinder?)
यासाठी वेबसाईट किंवा कंपनीचे अॅपवर रजिस्ट्रेशन लागणार आहे. जेव्हा ग्राहक गॅस बुकिंग करतील तेव्हा त्यांना अन्य डिस्ट्रीब्यूटर्सची यादी रेटिंगसह दिसणार आहे. ग्राहक त्याच्या पसंतीनुसार गॅस रिफिलसाठी तो डिस्ट्रीब्युटर निवडू शकतात. त्या डिस्ट्रीब्यूटरकडे ग्राहकाचा संपर्क क्रमांक आणि त्याला सुविधा देण्याचा पर्याय असणार आहे. ग्राहक त्याचा निर्णय तीन दिवसांत मागेही घेऊ शकतो. नाहीतर त्याचे कनेक्शन त्या नव्या डिस्ट्रीब्युटरकडे वळते केले जाणार आहे. ही सुविधा नि:शुल्क आहे. म्हणजेच यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीएत.
कसे कराल...
- इंडेन ग्राहक https://cx.indianoil.in किंवा इंडियन ऑईल वन मोबाईल अॅपचा वापर करा.
- बीपीसीएल भारत गॅस ग्राहक https://my.ebharatgas.com किंवा हॅलो बीपीसीएल मोबाईल अॅप वापरावे.
- हिंदुस्तान पेट्रोलियम https://myhpgas.in किंवा एचपी मोबाईल अॅप.
- आयव्हीआरएस किंवा एसएमएस नंबरद्वारे रिफिल बुकिंग करायची असेल तर त्या कंपन्यांच्या नंबरवर फोन करावा लागणार आहे. इंडेन - 7718955555 आणि बीपीसीएल- 7715012345/7718012345.
मिस कॉल....मिस कॉलद्वारे बुकिंग करायची असेल तर इंडेन-8454955555, बीपीसीएल - 7710955555 आणि एचपी - 9493602222 या नंबरवर फोन करावा लागणार आहे. व्हॉट्सअॅपवर इंडेन-7588888824, बीपीसीएल - 1800224344, एचपी ग्राहक - 9222201122 संपर्क करू शकतात. याशिवाय अन्य Amazon, Paytm आदी अॅपद्वारे बुक करू शकता.