मार्गासनी : वेल्हे तालुक्यात लंम्पी आजाराचा शिरकाव झाला असून धानेप येथील पप्पू भाऊ चोर यांच्या बैलाला लंम्पी आजाराची लागण झालेली आहे. अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. बी.डी चव्हाण यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना पशुधन विकास अधिकारी डॉक्टर चव्हाण म्हणाले की, शेतकरी पप्पू भाऊ यांच्या बैलाला लंपी आजाराची लागण झाली असून गेल्या चार दिवसापासून बैलावर उपचार सुरू आहेत. सध्या बैल व्यवस्थित असून चारापाणी व्यवस्थित घेत आहे. बैलाला कोणताही धोका नाही. लंपी आजारावर लसीकरणासाठी लस प्राप्त झाली असून विहीर अंत्रोली धानेप येथील 200 जनावरांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
शनिवारी वेल्हे, वेल्हे बुद्रुक, भट्टी ,वाघदरा ,कोंढावळे येथील आसपासच्या जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लंपी या आजाराची लागण दाणे पेतील बैलाला झाल्यानंतर तहसीलदार शिवाजी शिंदे गटविकास अधिकारी पंकज शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी शेतकरी यांच्या घरी भेट दिली. याबाबत शेतकरी पप्पू चोर म्हणाले, मागील चार दिवसापासून बैलाला शासकीय डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केल्याने सध्या बैलाला कोणताही त्रास होत नाही. माझा बैल व्यवस्थित आहे.