शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

आर्मी अधिकारी असल्याचं सांगितलं; अन् नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांना ५० लाखांना गंडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 5:34 PM

लॉकडाऊनचे कारण सांगत आरोपीने नातेवाईक, मित्रमंडळी, भटजी विना बंद खोलीत आतापर्यंत चार मुलींशी लग्न केले असून तो आणखी ५३ मुलींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे.

बिबवेवाडी : आर्मी अधिकारी असल्याचे भासवून तरुणींशी जवळीक साधत आणि त्यांना लग्नाच्या बंधनात अडकवत होता. तसेच त्यांच्या ओळखीच्या नातेवाईकांमध्ये असलेल्या तरूण मुलांना आर्मीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी बिबवेवाडी येथे राहत असलेल्या तरुणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. 

आरोपी योगेश दत्तू गायकवाड (वय २७ रा.मु.डोंगरगाव, ता.कन्नड जि.औरंगाबाद) व त्याचा साथीदार संजय ज्ञानबा शिंदे (वय ३८, रा. केडगाव ता.जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  

बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीकडून आर्मीचे कपडे, खोटे शिक्के, बनावट बिल्ले, टी शर्ट वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जाणाऱ्या टोप्या तसेच खोटी जॉइनिंग लेटर्स व एक चारचाकी गाडी,दोन दुचाकी गाड्या असा एकूण ५,४१,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी तरुणी अणि तिची आई बिबवेवाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यासाठी आल्या होत्या. त्या हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षाची वाट बघत असताना पँटच्या मागील खिशातून आधारकार्ड पडल्याचे फिर्यादीने पाहिल्यामुळे ते परत देण्यासाठी आरोपी संजय शिंदेला आवाज दिला. यानंतर आरोपीने फिर्यादीशी जवळीक साधत आर्मी अधिकारी असल्याचे सांगितले. त्याच्या जवळील आर्मीच्या पोशाखातील फोटो व बनावट ओळखपत्र दाखवून फिर्यादी तरुणी व तिच्या आई वडिलांचा विश्वास संपादन करत तरुणीशी लग्न केले. 

आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने लॉकडाऊनचे कारण सांगत नातेवाईक, मित्रमंडळी, भटजी विना बंद खोलीत आतापर्यंत चार मुलींशी लग्न केले आहे. तसेच एका पत्नीला त्याच्यापासून 2 अपत्ये आहे. तो आणखी ५३ मुलींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर आरोपी योगेश गायकवाडने आर्मीमध्ये मोठी भरती निघाल्याचे सांगत फिर्यादीच्या भावाला आर्मीमध्ये नोकरी लावून देतो म्हणून फिर्यादीच्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या गावातील नातेवाईकांचा व गावाबाहेरील तरुणांचा विश्वास संपादन करत त्यांना आर्मीमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या भावाचे व इतर काहीजणांची खोटे जॉईनिग लेटर दाखवत फसवणूक करून विश्वासघात केला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, व गुन्हे पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर,पोलीस नाईक तात्या देवकते, पोलीस अंमलदार अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, अमोल शितोळे, दिपक लोधा, राहुल कोठावळे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीArrestअटक