पुणे : कोरोनाबाधितांना आॅक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरर्स, नर्स व अन्य वैद्यकीय सहाय्यकांचा पुरवठा करण्याची निविदा पीएमआरडीने काढून संबंधित कंपनीस काम दिले आहे.परंतु, सध्या शहरात या कंपन्यांकडून महापालिकेने करार केलेल्या खागी हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स यांनाच मोठ्या पगाराचे आमिष देऊन आकर्षित करण्याचे प्रकार केले जात आहेत.
याकरिता डॉ.संदीप गुप्ता व डॉ.धनश्री या अपरिचित डॉक्टरांव्दारे, जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी मोठ्या पगाराचे आमिष दिले जात असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी केला आहे. चोरबेले यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून, संबंधित प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी जम्बो आॅफर देणारे वॉटस्अप मेसेज सध्या वैद्यकीय सेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी डॉक्टरांना ६० हजार रूपये तसेच नर्स यांना ३५ ते ४० हजार मासिक वेतन, निवास भोजन व्यवस्था व दररोज पीपीई किटची आॅफर दिली गेली आहे.
महापालिकेने काही दिवसांपूर्वीच कोविड केअर सेंटरकरिता सहा महिन्यांसाठी हंगामी डॉक्टर्स आणि नर्स यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच काही स्पेशालिस्टही आहेत. परंतु आता या नव्या जम्बो आफॅरमुळे हे सर्व नवनियुक्त वैद्यकीय सेवक या जम्बो हॉस्पिटलकडे गेल्यावर पालिकेची करोना विरुद्ध लढ्याई खिळखिळी होण्याची शक्यता आहे.
----------------
पीएमआरडीएकडून खासगी कंपनी नियुक्त : पण कंपनीचा डल्ला पुण्यावरच
एक जम्बो हॉस्पिटल उभारणीकरिता ८० ते ८५ कोटी रूपये खर्च करणाºया ‘पीएमआरडीए’कडून या हॉस्पिटलच्या मेडिकल स्टाफच्या पुरवठ्यासाठीही निविदा प्रसिध्द करून मोठ्या कंपन्यांना काम दिले आहे. परंतु सदर कंपनीकडून पुण्यातीलच वैद्यकीय सेवकांवर (डॉक्टर, नर्स) डल्ला मारण्याचा प्रकार सुरू आहे.
जम्बो हॉस्पिटल सुरू झाल्यावर कुठल्याही मेडिकल स्टाफची कमतरता पडणार नाही असा दावा या कंपन्यांनी केला आहे.पण त्यांच्याकडून पुण्यातील उपलब्ध वैद्यकीय सेवाच खिळखिळी करण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
---------------