पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची ओळख सांगत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळणाऱ्या तरुणाला रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये गुजरात संघाकडून खेळवण्याचे आमिष दाखवत व्यावसायिकाला ५ लाख रुपयांना गंडवण्यात आले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा प्रकार एप्रिल २०१४ ते २० एप्रिल २०१५ या कालावधीमध्ये घडला. पोलिसांनी राहुल मुकेशकुमार गोयल (वय २१, रा. नई मंडी, मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रताप जाधव (वय ४७, रा. पिसोळी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेल्या जाधव यांचा मुलगा प्रेम जाधव क्रि केट खेळाडू आहे. तो सध्या मुंबई क्रिकेट अयोसिएशनकडून खेळतो. रणजीमध्ये निवड होण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. एका मध्यस्थामार्फत जाधव यांची गोयलसोबत ओळख झाली. गोयल याने आपली अध्यक्षासोबत ओळख असल्याचे सांगितले. याच ओळखीमधून जाधव यांच्या मुलाला रणजीसाठी गुजरात संघामध्ये निवड करुन देण्याचे आमिष दाखवून गोयल याने ५ लाख रुपये उकळले.
रणजी ट्रॉफीमध्ये निवडीच्या आमिषाने ५ लाखांना गंडा
By admin | Published: April 23, 2016 1:05 AM