शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘मशिन कॅनॉट डिसाईड व्हॉट इज क्रिएटिव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 14:20 IST

सध्याच्या काळात दूरदर्शनचे अस्तित्व काहीसे धूसर....

आज देशभरात खासगी वाहिन्यांचे जाळे सर्वत्र विखुरलेले असले, तरीही भारताच्या कानाकोपऱ्यांत पोहोचणारे हक्काचे दृकश्राव्य माध्यम म्हणून ‘दूरदर्शन’चा दबदबा होता. सध्याच्या काळात दूरदर्शनचे अस्तित्व काहीसे धूसर झाले असले, तरी एकेकाळी दूरदर्शनवरील दर्जेदार कार्यक्रमांनी रसिकांचे मनोरंजन केले. भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्राशी चाळीस वर्षे सिनेमॅटोग्राफर म्हणून संबंधित असलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील टीव्ही विभागाचे सहयोगी प्राध्यापक भारत नेरकर यांच्याशी दूरदर्शनच्या स्थित्यंतराविषयी साधलेला हा संवाद. ...... 

 

नम्रता फडणीस। * दूरदर्शनशी तुमचा संबंध कधी आणि कसा आला?- मुंबई दूरदर्शन १९७२ मध्ये सुरू झालं. तेव्हा मी एफटीआयआयमध्ये  सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेत होतो.  १९७४ मध्ये दूरदर्शनच्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यासाठी एफटीआयआयमध्ये केंद्र उघडण्यात आले होते. आता एफटीआयआयमधील टीव्ही विभाग त्याला आम्ही प्रशिक्षण केंद्र म्हणायचो. दूरदर्शनच्या कर्मचाºयांना इथे प्रशिक्षण दिले जायचे. एफटीआयआयमधून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर, याच प्रशिक्षण केंद्रात नोकरी केली. त्या काळात मुंबई, कलकत्ता दूरदर्शनचे निर्माते इथे प्रशिक्षण घेऊन जायचे. त्यांना मी मार्गदर्शन करायचो.* सत्तरीच्या दशकात दूरदर्शनचे काम कसे चालायचे? कोणत्या गोष्टींवर अधिक भर दिला जायचा?-दूरदर्शनचे निर्माते साधी संकल्पना घेऊन काम करायचे. न्यूज, टू बेस, संवादात्मक कार्यक्रम करताना ते गोष्टी फार ड्रामटाइज करत नव्हते. तंत्रज्ञानातील क्रांती आणि  निर्मितीच्या बदलत्या पद्धतीचा परिणाम जागतिक स्तरावर दिसू लागला होता. कॅमेरा, सेटची कमाल, लाइटस, टू लेन्स, कलर या गोष्टी येऊ लागल्या होत्या. लाईट, लेन्स कलर आणि स्पेस  ही सिनेमॅटोग्राफीची वैचारिक साधने आहेत. या साधनांची मूलभूत माहिती असल्यामुळे त्याच गोष्टी पुढे आमच्या कामाला आल्या. त्यात कॅमेरा अँगल, इनोव्हेटिव्ह मूव्हमेंटस याचा वापर आम्हाला करता आला. निर्माते आणि कॅमेरामन यांना देखील त्याबद्दलची दृष्टी आली. आज तर तंत्रज्ञान खूप वेगाने बदलते आहे. एखादा कार्यक्रम इंटरेस्टिंग कसा करता येईल, ही कमाल कॅमेराच्या ताकदीतून दाखविणे शक्य झाले.............* इतर वाहिन्यांच्या तुलनेत दूरदर्शनचे स्थान काय? दूरदर्शन तंत्रज्ञानाच्या तुलनेत खासगी वाहिन्यांच्या स्पर्धेत मागे पडले आहे का?-कदाचित तंत्रज्ञानाच्या अभावामुळे दूरदर्शन मागे पडलेले असू शकते. पण, याचबरोबर कार्यक्रमाचा दिग्दर्शक किंवा कॅमेरामन यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत की नाहीत, हा देखील प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या मर्यादा अगदी व्ही. शांताराम यांच्या काळातही होत्या. पण, त्यांनी वेगळा विचार केला. ही विचारांची ताकद तुमच्याकडे असायला हवी. जरी तंत्रज्ञान उपलब्ध नसेल, तरी इफेक्ट आणण्यासाठी वेगळा काय पर्याय देऊ शकतो याचे भान कार्यक्रम निर्मित करणाºया व्यक्तीकडे हवे.  शासकीय संस्था असल्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असू शकतो. त्यामुळे तडजोडी केल्या जातात. पण, खासगी वाहिन्या अशा तडजोडी करत नाहीत. शेवटी कॅमेरा, लाईटस एकच आहेत. केवळ कलात्मक कौशल्याची गरज आहे.  ‘मशिन कॅनॉट डिसाईड व्हॉट इज क्रिएटिव्ह, ओन्ली ब्रेन कॅन डिसाईड’ असे माझे म्हणणे आहे.  .

टॅग्स :PuneपुणेTelevisionटेलिव्हिजन