प्रशांत दुर्गाजी शेवाळे ( वय ४३ वर्ष, रा-लांडेवाडी, ता.आंबेगाव) असे या कामगाराचे नाव आहे. पोलीसांनी लांडेवाडी येथील त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ३० लाख रुपये किंमतीचे मशीनही जप्त करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतून प्लॅॅस्टीक वेल्डींग करण्याचे हे मशीन दरवाजाची काच तोडून चोरण्यात आले होते. या गुन्हयाचे तपास करत असताना कंपनीमध्ये प्रवेश करणे व मशीन्स ठेवलेल्या कपाटामधुन मशीन्स काढुन चोरी करणे यावरून चोरी ही कंपनीमधील माहीतीतील व्यक्तीने केली असावी असा संशय पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना आल्याने त्या अनुषंगाने त्यांनी तपास सुरु केला. कंपनी मधील संशयीत कामगारांचे मोबाईल कॉल डिटेल प्राप्त करुन त्यांचे तांत्रिक विश्लेषन व सोशल मिडीयाचे माध्यमाद्वारे शोध घेतला. एका माजी कंपनी कामगार बाबत संशय आल्याने बातमीदार मार्फत त्याची माहीती घेतली असता तो कामगार चोरी झालेल्या मशीनचे वर्णना सारखे मशीन विक्री करीता गिन्हाईक शोधत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताञय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टमपल्ले, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, राजु जाधव, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, श्रीधन इचके, शरद खैरे यांनी या गुन्हयाचा तपास केला.