किवळे : विकासनगर, मामुर्डी व किवळे गावठाण येथील एकूण २० मतदान केंद्रांवर बावीस हजार पाचशे अडतीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवरील यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. विकासनगर येथील विस्डम हायस्कूल येथे बारा मतदान केंद्रे (क्रमांक तीन ते तेरा ) आहेत. एकूण १२ हजार ५८३ मतदार आहेत. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मतदान यंत्रणेतील सर्व कर्मचारी साहित्यासह दाखल झाले आहेत. पोलीस कर्मचारी व अधिकारीही दाखल झाले आहेत. विस्डम हायस्कूल मतदान केंद्रावर माळवालेनगर, विकासनगर, श्रीनगर, दत्तनगर, सरपंच वस्ती, म्हसुडगे वस्ती आदी भागातील मतदारांना येथे मतदान करता येणार आहे. मंगळवारी दुपारपासून येथील सर्व मतदान केंद्रावर खोली क्रमांक, नमुना मतपत्रिका, सूचना, मतदान कक्ष बसविण्याचे काम करण्यात कर्मचारी मग्न होते. विकासनगर येथील महापालिकेच्या हभप. मल्हारराव तरस प्राथमिक शाळेत (शाळा क्रमांक 95 ) एकूण चार केंद्रांवर ( केंद्र क्रमांक चौदा ते सतरा ) मतदान होणार आहे. येथे एकूण चार हजार पाचशे तेहतीस मतदार आहेत. येथील केंद्रांवर कर्मचाऱ्यांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बापदेवनगर, नेटके कॉलनी, एम बी कॅम्प व विकासनगरच्या उर्वरित भागातील मतदारांना येथे मतदान करता येणार आहे. (वार्ताहर)
किवळे परिसरात २० केंद्रांवरील यंत्रणा सज्ज
By admin | Published: October 15, 2014 5:38 AM