शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कौतुकास्पद! माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 3:58 AM

पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या पदावर निवड झाली.

पुणे : पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या पदावर निवड झाली. अनेक महिन्यांपासून या पदावर त्यांच्या नावाची चर्चा होती. शनिवारी संरक्षण मंत्रालयातर्फे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्या पदावर निवड झालेल्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या तर देशातील तिसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्या डेप्युटी चीफ इंटीग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या प्रमुख म्हणून काम सांभाळतील.माधुरी कानिटकर पुण्यातील लष्करी महाविद्यालयाच्या पहिल्या महिला अधिष्ठाता होत्या. सध्या त्या उधमपूरच्या युद्ध चिकित्सा विभागाच्या प्रमुख आहेत. शनिवारी लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी, तसेच त्यांचे पती माजी लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांच्या हस्ते त्यांना लेफ्टनंट जनरल पदाची रँक बहाल करण्यात आली.कानिटकर यांनी १९८० मध्ये एमएमबीबीएस मधून पदवी घेतली. त्यानंतर, त्यांनी पीडियाट्रिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. जवळपास चार दशके लष्कराच्या मेडिकल सर्व्हिस क्षेत्रात काम केल्यानंतर, त्या लष्करातील पहिल्या ट्रेन पीडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट व नंतर लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता बनल्या. त्यांनी लष्कराच्या वैद्यकीय सेवेत बाल चिकित्सा नेफ्रोलॉजी विभाग सुरू केला. त्यांचे पती राजीव कानिटकर लष्करातून निवृत्त झाले आहेत.