शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जमिनीच्या पोटातही माफियांची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 6:31 AM

चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खालुंब्रे, महाळुंगे (ता. खेड) गावांच्या हद्दीत माळरानांमध्येही घुसून बेकायदेशीरपणे राजरोस मुरमाची चोरी होत असल्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत.

शरद भोसले महाळुंगे : चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खालुंब्रे, महाळुंगे (ता. खेड) गावांच्या हद्दीत माळरानांमध्येही घुसून बेकायदेशीरपणे राजरोस मुरमाची चोरी होत असल्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. मुरूम माफियांनी या भागात धुमाकूळ घातला आहे. खालुंब्रे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एमआयडीसी फेज- २, एचपी चौक परिसरामध्ये पडीक जागेवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा भरावाचे काम सुरू आहे. डोंगर, टेकड्या पोखरून निर्ढावलेले हे लोक आता थेट जमिनीच्या पोटात शिरू लागले असून, सर्वच मुरूम माफियांना कारवाईच्या कात्रीत आणण्याची गरज निर्माण झाली आहे.या ठिकाणी असेलला ओढादेखील बुजविण्याचा घाट घातला असून, त्याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील भागात खूप मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या कंपन्या व कारखान्यांची बांधकामे वेगात सुरू आहेत. त्यासाठी लागणारा हजारो ब्रास मुरुम या पद्धतीने काढला जात आहे. ठिकठिकाणच्या माळरानामध्ये जेसीबीच्या साह्याने उत्खनन करून कोणतीही रॉयल्टी न भरता तसेच वाहतूक परवाना न घेता, डंपरमधून मुरूम नेला जात आहे. एकेका रात्रीत हजारो ब्रास मुरूम गायब होत आहे.अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करणाºया मुरूम माफियांबरोबर कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता खालुंब्रे हद्दीतील एमआयडीसी फेज- २, खूप मोठ्या प्रमाणावर रातोरारात भरावाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणच्या जागेत असलेले ओढेदेखील बुजविण्यात आल्याचे दिसत आहे. याबाबत चौकशी करून संबंधित मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीने जोर धरला आहे.चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे, खालुंब्रे भागात अनेक दिवसांपासून सुरू असलेला मुरूम माफियांचा धुमाकूळ रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. मात्र, याकडे संबंधित विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील औद्योगिक खालुंब्रे व महाळुंगे परिसरात तसेच डोंगर, छोट्या टेकड्या व गायरान खासगी मालकीच्या जमिनी पोखरून प्रचंड प्रमाणात गौण खनिजाची चोरी सुरू आहे. परिसरातील मोकळ्या असलेल्या जागामधील मुरूमचोरी दिवसरात्र सुरू आहे. या मुरूम माफियांना कायद्याचीही भीती राहिलेली नाही. या चोरीमुळे लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे. मुरूम माफिया मात्र लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत.कमी कष्टात जास्त मोबादला मिळविण्यासाठी डोंगर, टेकड्या तर सोडल्याच नाहीत. औद्योगिक परिसरातील मोकळ्या भूखंडावरही कुठल्याही बाजूला जा जेसीबीसारखी मोठी यंत्रे जमीन पोखरून मुरूमचोरी होत असल्याचे समोर येत आहे. दिवसा मुरूमचोरी करणे तसे अवघडच आहे. यासाठी रात्री गुंडांच्या दहशतीवर गौण खनिजाची चोरी सुरू आहे. महसूल विभागाचे या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्षाने (किंवा तडजोडीने) कित्येक दिवसांपासून या परिसरात कुठल्याही शासकीय परवानगीविना किंवा रॉयल्टी न भरताही मुरूमउपसा जोरात सुरू आहे. मोठ्या जेसीबी मशिन व डंपरच्या साह्याने रात्रभर हजारो ब्रास मुरूम गायब केला जात आहे. निर्ढावलेले मुरूम माफिया बिनदिक्कतपणे मोकळ्या व सपाट जागेवर अवाढव्य खड्डे पाडत आहेत. औद्योगिक परिसरात व एचपी चौकाशेजारील मोकळ्या जागेवर मोठाले खड्डे पडलेले दिसत आहेत. खालुंब्रे महाळुंगे येथील गायरानाच्या भोवताली अनेक प्रकारचे प्राचीन व दुर्मिळ वृक्षांचे आणि प्रसिद्ध असलेल्या गवताच्या रानांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. २० ते ३० फूट खोल खड्डे खणून त्यातील गौण खनिजाची चोरी करण्यात आली आहे. महाळुंगेच्या गायरनामध्ये मोठ्या प्रमाणात बोरे, करवंदे, आंबोळी व तुती अशी अनेक जंगली झाडे व या फळांचा रानमेवा वाढत्या औद्योगिकीकरणाने आता दुर्मिळ झाला आहे.