शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

मोरगांवच्या मयुरेश्वराची माघी यात्रा रविवार पासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 7:52 PM

सर्व धर्मियांना ‘श्रीं’ना जलस्नान घालण्याची पर्वणी

बारामती : अष्टविनायक आराध्य दैवत मोरगांव (ता.बारामती) येथील माघी यात्रा उत्सव रविवार दिनांक २२ पासून सुरू होत आहे.  यात्रा उत्सवाच्या निमित्ताने  दि २२ ते  दि २६ पर्यंत निमित्ताने सर्व धर्मियांना श्रींस जलस्नान घालण्याची पर्वणी पहाटे पाच ते दुपारी १२ वाजेपर्यंत साधता येणार आहे. यंदा तिथीचा क्षय नसल्याने माघ प्रतिपदा ते माघ पंचमीपर्यंत सर्व धर्मियांना मयुरेश्वरास स्व:हस्ते जलस्नान घालता येणार आहे, अशी माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.

सालाबादप्रमाणे येथील माघी यात्रा उत्सव रविवार सुरू होत आहे. या यात्रा उत्सवाची चिंचवड देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. उत्सवाच्या निमित्ताने सर्व धर्मियांना मयुरेश्वरास स्वहस्ते जलस्नान व अभिषेक घालण्याची पर्वणी साधता येणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. उत्सवनिमित्ताने मंदिराच्या चार दिशांना असणारे धर्म ,अर्थ, काम ,मोक्ष या चार द्वार मंदिरापर्यंत अनवाणी चालत जाऊन  दुर्वा, फुले वाहण्याची विशिष्ट अशी प्रथा आहे.

उत्सवा निमित्ताने श्रीमन् महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा चिंचवडवरुन मोरगाव येथे दि. २४  सायंकाळी सात वाजता येणार आहे. या दरम्यान घरोघरी रांगोळीचे सडे व फटाक्यांची आतषबाजी करत मंगलमुर्ती पालखीचे स्वागत केले जाते. यात्रा उत्सव काळात श्रींची महापूजा, पदे, शेंदूरपाडा, श्रींचा विवाह, महाप्रसाद, छबिना आदी कार्यक्रम संपन्न  होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीSocialसामाजिकtempleमंदिर