...तर महाराष्ट्रात वेगळं चित्र पाहायला मिळेल; अजितदादांनी सांगितलं महाविकास आघाडीचं भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 01:12 PM2023-02-03T13:12:39+5:302023-02-03T13:16:30+5:30

काल राज्यात विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला, या निकालात अनेकांना धक्के बसले आहेत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Maha Vikas Aghadi will show a different picture in Maharashtra in future says Leader of the Opposition ajit pawar | ...तर महाराष्ट्रात वेगळं चित्र पाहायला मिळेल; अजितदादांनी सांगितलं महाविकास आघाडीचं भविष्य

...तर महाराष्ट्रात वेगळं चित्र पाहायला मिळेल; अजितदादांनी सांगितलं महाविकास आघाडीचं भविष्य

googlenewsNext

पुणे- काल राज्यात विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला, या निकालात अनेकांना धक्के बसले आहेत. काँग्रेसने सत्यजीत तांबेंना उमेदवारी दिली असती तर नवा चेहरा म्हणून समोर आले असते. राज्यात तोडफोडीच राजकारण चालत नाही, असं या निकालावरुन दिसतं, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केले.

'भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात असुनही त्यांना उमेदवार मिळालेले नाहीत. महाविकास आघाडी इथून पुढच्या काळात अधिक चांगल्या प्रकारे विचारपूर्वक उमेदवार देण्यासाठी आणि समंजस भूमिका सर्वांनी दाखवली तर महाराष्ट्रात उद्याच्या काळात वेगळी परिस्थिती दिसेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. 

एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का?; अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

'राज्यात तोडाफोडीचे राजकारण केले तर ते चालत नाही हे राज्यातील शिक्षकांनी दाखवून दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीने कोरोना काळात चांगले काम केले आहे, असंही अजित पवार म्हणाले. 

अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडून राज्यानं ऐतिहासिक सत्तांतर पाहिलं. नवं सरकार सत्तेत येऊन आता काही महिनेही उलटले आहेत. पण असं असतानाही सत्ताधारी पक्षाला इतक्या मोठ्या बंडाची जराशीही कल्पना नव्हती यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. राज्यातील या ऐतिहासिक राजकीय घडमोडींबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. 

आमदार फुटणार आहेत हे आधीच कळलं होतं. तसं उद्धव ठाकरेंना आम्ही कळवलं देखील होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. त्यात अजित पवार बोलत होते. एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का? या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार यांनी पडद्यामागची सर्व कहाणी सांगितली. 

"दोन-तीन वेळेला तशी माहितीही मिळाली होती. पवार साहेबांनीही उद्धवजींना माहिती दिली. मीही त्यांना माहिती दिली होती. शरद पवारांनी तर बैठक देखील घेतली होती. पण उद्धव ठाकरे म्हणायचे की मला माझ्या आमदारांवर विश्वास आहे. ते इतकी टोकाची भूमिका घेणार नाहीत असं त्यांना वाटायचं. पण जो पहिला ग्रूप १५-१६ आमदारांचा गेला. त्यानंतर आमदारांना एकजुटीनं सोबत ठेवण्याची गरज होती. तशाप्रकारची गरज त्यावेळी दाखवली गेली नाही. मग मुभा असल्यासारखं तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, ज्यांना थांबायचं आहे त्यांनी इथं थांबा असं वातावरण त्यावेळी पाहायला मिळालं. आता वस्तुस्थिती काय हे त्यापक्षाचेच नेते सांगू शकतील", असं अजित पवार म्हणाले. 

Web Title: Maha Vikas Aghadi will show a different picture in Maharashtra in future says Leader of the Opposition ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.