स्वारगेट आगारातून महाबळेश्वर दर्शनसाठी सकाळी ७ वाजता निमआराम बस सुटत आहे. आर्थर पॉईंट, केटस पॉईंट, स्ट्रॉबेरी गार्डन, क्षेत्र महाबळेश्वर, पंचगंगा मंदीर, सनसेट पॉईंट या ठिकाणी ही बस जाईल. ही गाडी रात्री ९ वाजता स्वारगेट स्थानकात दाखल होईल. या सेवेसाठी प्रति प्रवासी ४८० रुपये प्रवास भाडे निश्चित केले आहे. स्वारगेट-रायगड दर्शन ही सेवा दि. २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही गाडी स्वारगेट आगारातून सकाळी ६.४५ वाजता सुटेल. तर रायगड दर्शन करून सायंकाळी ६.४५ वाजता स्वारगेट स्थानकात पोहचेल. प्रति प्रवासी ६१० रुपये प्रवासी भाडे आकारण्यात येणार आहे.
महामंडळाकडून अष्टविनायक दर्शन ही बससेवाही सुरू केली आहे. प्रत्येक चतुर्थीला व ग्रुप बुकिंग किंवा प्रवाशांच्या मागणीनुसार इतर दिवशीही सोडण्यात येईल. त्यासाठी जवळच्या आगार व्यवस्थापकांकडे नोंदणी करावी लागेल. या बससेवा आॅनलाईन आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. महामंडळाचे संकेतस्थळावरून आरक्षण करता येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.
--------------