शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

कचरा पेटल्याने महावितरणच्या वीजवाहिन्या जळाल्या

By admin | Published: May 11, 2017 5:00 AM

पेटलेल्या कचऱ्यामुळे वीजवाहिन्या पेटल्याने सिंहगड रस्ता परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये वडगाव

पुणे : पेटलेल्या कचऱ्यामुळे वीजवाहिन्या पेटल्याने सिंहगड रस्ता परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये वडगाव, धायरीगाव, नांदेडगाव आणि सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नांदेड सिटीजवळील वडगाव पुलाजवळ असलेल्या महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ टाकण्यात आलेला कचरा सकाळी साडेअकराच्या सुमारास पेटला. तत्पूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचे कर्मचारी वीजयंत्रणेची तपासणी करीत होते, त्या वेळी कचऱ्यामुळे वीजवाहिन्या जळत असल्याचे निदर्शनास आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. या आगीत उच्च दाबाच्या ५ वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे खडकवासला उपकेंद्राच्या दोन इनकमिंग वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी, या उपकेंद्रातील तीन आऊटगोइंग वाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे धायरीगाव, वडगाव, नांदेडगाव, सिंहगड रस्ता या परिसरातील सुमारे २५ हजार वीजग्राहकांना फटका बसला. महावितरणकडून दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.