नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 07:06 PM2024-09-29T19:06:00+5:302024-09-29T19:06:23+5:30

शासनाने ५ वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची नाभिक बांधवांची तक्रार

Mahadharne movement of core community in Mumbai All shops of Nabhik Sangathan closed in Baramati on Monday | नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

बारामती: सोमवारी(दि ३०) सकल नाभिक समाजाचे मुंबई येथे महाधरणे आंदोलन असल्यामुळे बारामतीतील सर्व दुकाने बंद राहतील, अशी बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने, सुदाम कडणे, किरण कर्वे यांनी  संघटनेच्या वतीने माहिती दिली.

हे सकल नाभिक समाजाचे महाधरणे आंदोलन  आहे. संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा,नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रतील सकल नाभिक समाज  सोमवारी आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेणार आहे, अशी माहिती किरण भांगे यांनी दिली. शासनाकडे दिलेल्या निवेदनात केशशिल्पी महामंडळास १००० कोटी रुपयांचा निधी द्यावा, उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने जाहिरात काढावी व संचालक मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, शासकीय सदस्य यांच्या निवडी कराव्यात, थेट कर्ज योजनेतील सिबिल व जामीनदारांची जाचक अट शिथिल करावी, उपकंपनीचे लेटरहेड, कार्यालय, माहितीपत्रक यांच्यावर सेना महाराजांचा फोटो वापरावा या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.

१३ सप्टेंबर २०१९ रोजी स्थापन केलेले केशकला बोर्ड अग्रेषित करून ५ जानेवारी २०२४ रोजी ओबीसी महामंडळाची उपकंपनी करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूद केलेले आहे. परंतु कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे शासनाने ५ वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची भावना नाभिक बांधवांची आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. आंदोलनासाठी महाराष्ट्रातील विविध संघटना एकत्र आल्या आहेत.

Web Title: Mahadharne movement of core community in Mumbai All shops of Nabhik Sangathan closed in Baramati on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.