पुणे : महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर कलाकार कल्याण मंडळ शासनाने स्थापन करून कलावंतांची अडचणी दूर करण्याचे काम या मंडळामार्फत व्हावे,सर्व कलाकारांचा आरोग्य विमा शासनाने या मंडळामार्फत काढावा, कलावंतांसाठी घरकुल योजना, कोरोनाच्या काळातील आपत्कालीन तातडीची मदत, विविध कला प्रकारात काम करणाऱ्या कलावंतांची नोंद शासनाकडे व्हावी, यांसारख्या विविध मागण्यांचा राज्य सरकारने तात्काळ विचार करावा या उद्देशाने 'महाकलामंडल'च्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यात झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व कलाप्रकारातील १२० संघटनांची माहिती शरद पवार यांनी घेतली.पवार साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे महाकलामंडलच्या शिष्टमंडळला अतिशय आनंद झाला. लवकरच ही मीटिंग होईल अशी अशा आहे. या शिष्टमंडळात महा कला मंडल चेअध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, जयमाला काळे इनामदार, पूजा पवार साळुंखे हे उपस्थित होते.
पुण्यात 'महाकलामंडल'च्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 6:57 PM