महाळुंगे येथील जिजामाता अस्मीता भवन येथे या कार्यक्रमाचे महाळुंगे भारतीय डाक शाखेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील प्राथमिक स्वरुपात काही मोजक्या व्यक्ती व लोकप्रतिनिधींना यावेळी बोलवण्यात आले होते. डाक विभागाच्या वेगवेगळ्या योजना तसेच समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महाळुंगे येथील डाक विभागाचे पोस्ट मास्तर संदीप महाळुंगकर यांनी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी युवा उद्योजक संतोष जावळे होते. यावेळी अभिकर्ता डॉ एस.बी. कांबळे व मनीषा टकले उपस्थित होते. सूत्रसंचालन पोस्ट ऑफिस महाळुंगे येथील जीडीएस एमडी राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन बीपीएम संदीप महाळुंगकर यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान पी. एल. आयच्या पाच पॉलिसी पीपीएफ तीन खाते व सुकन्या योजनेच्या सहा खाते काढण्यात आले.
--
फोटो क्रमांक : १६ महाळुंगे डाक विभाग
फोटो
महाळुंगे (ता. खेड) येथे भारतीय ग्रामीण डाक विभागातर्फे पी.एल.आय महालॉगिन डे
160721\16pun_4_16072021_6.jpg
फोटो क्रमांक : १६ महाळुंगे डाक विभागफोटो महाळुंगे (ता. खेड) येथे भारतीय ग्रामीण डाक विभागातर्फे पी.एल.आय महालॉगिन डे