कोरोनाची पहिली लाट आली त्या वेळी मंचर शहरात घर टू घर सर्व्हे करून संशयितांची चाचणी करण्यात आली होती. यामुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. मंचर शहरात मागील काही दिवसांपासून प्रत्येक दिवशी चाळीस-पन्नास पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मंचर ग्रामपंचायतीच्या वतीने मंचर शहरासाठी महा ॲंटिजन टेस्ट करून एकाच दिवशी मंचर शहरातील नागरिकांसाठी सहा वाॅर्डमध्ये कोरोना तपासणी केली जाणार आहे.
चाचणी होणारी केंद्रे पुढीलप्रमाणे : वॉर्ड क्रमांक 1. मोरडेवाडी शाळा व मुळेवाडी अंगणवाडी, वाॅर्ड क्रमांक 2 चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वाॅर्ड क्रमांक 3 पंचांचा वाडा, वॉर्ड क्रमांक 4. मल्हार मंगल कार्यालय, वॉर्ड क्रमांक 5. लोंढेमळा शाळा, वाॅर्ड क्रमांक 6. अस्मिता भवन. चाचणीच्या आदल्या दिवशी संपूर्ण शहराचा शिक्षकांच्या मदतीने सर्व्हे केला आहे. त्यामुळे टेस्ट करण्यास कोणताही अडथळा येणार नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी के.डी. भोजने यांनी दिली.