लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : आषाढी एकादशीनिमित्त माऊलींचे विसावा ठिकाण असलेल्या वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात प्रथापरंपरेचे पालन करीत पांडुरंग-रुखमाई मातेची महापूजा व माऊलींच्या पादुकांची पूजा दही, दूध व मधाचा अभिषेक करण्यात आला.
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर व सुनीता तापकीर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री पांडुरंग व संतश्रेष्ठ माऊलींना नैवेद्य दाखवून श्रीफळ व पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला. त्यानंतर भगवान पांडुरंगाची व माऊलींची आरती घेण्यात आली. याप्रसंगी सोमनाथ महाराज भालेराव, नंदराज महाराज पाटील, रमेश घोगडे, बालाजी मोहिते, शिवाजी गराडे, राजेंद्र नाणेकर, जग्नेश भोसले,स्मिता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरासमोर सुबक रांगोळी काढण्यात आली होती. तर मंदिरात बळवंत लाटे यांनी आकर्षक फुलांची सजावट केली होती. त्यामुळे मंदिर आकर्षक दिसून येत होते. भविकांना महाप्रसाद व खिचडीचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
फोटो ओळ : थोरल्या पादुका मंदिरात श्री पांडुरंगाची व माऊलींची पूजा करताना अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर व अन्य.