हडपसर : गेली पाच वर्षे फक्त हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनता विकासाच्या गप्पाच ऐकते आहे. भाजप सरकारची फक्त मोठमोठ्या विकासाचे दावे करणारी जाहिरातबाजी, आमिष यांना आता इथला सुज्ञ मतदार बळी पडणार नाही. मी बोलणाऱ्यांपैकी नाही तर करून दाखवणाऱ्यांपैकी एक आहे आणि इथल्या जनतेला त्याचा अनुभव आहे. मी हडपसरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन चेतन तुपे यांनी यावेळी केले. संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून जनसामान्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद त्यांना मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात मगर कॉलेज, महादेवनगर, अण्णासाहेब मगर कॉलेज, सुभाष सोसायटी, महादेवनगर, घुलेवस्ती, गोपाळपट्टी, बेलेकरवस्ती, चारवाडा, अनाजी वस्ती, व्हीएसआय रोड, मांजरी गावठाण व परिसरात त्यांनी लोकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. यावेळी सुरेश घुले, दिलीप घुले, प्रशांत घुले, अंकुश घुले, अजिंक्य घुले, नीलेश घुले, रमेश घुले, नंदू घुले, मंगेश तुपे, संदीप तुपे, रोहिणी तुपे, रामदास घुले, राहुल घुले, शिवाजी खलसे, दिलीप टकले, रवींद्र गोगावले, श्रीपाद घुले, समीर घुले, सागर बत्ताले, नेहा बत्ताले, जयश्री खलसे, सुधीर घुले, सचिन टकले, सुनील घुले, संजय घुले, योगेश टकले, सुनील घुले, राजेंद्र गारुडकर, विनय घुले, संतोष घुले व आदी उपस्थित होते.विकास हवा तर सक्षम, सुशिक्षित आणि समाजकारणास धरून विकासाभिमुख राजकारण करणारे नेतृत्व हवे अशी भावना इथल्या जनतेने व्यक्त केली आहे. शहरालगतची गावठाण, वाड्या-वस्त्या यांना उत्तम पायाभूत सुविधा, भविष्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करणे यासारखे अनेक मुद्दे यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार केले.
Maharahstra Election 2019 : हडपसरच्या विकासासाठी कटिबद्ध : चेतन तुपे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:53 PM