विजेत्या संघाला रोख ५१ हजार रुपये व मानाचा चषक देण्यात आला. स्पर्धेत अमित तापकीरला मालिकावीर, शुभम तळेकरला उत्कृष्ट फलंदाज तर अभिषेक कुंजीरला उत्कृष्ट गोलंदाज किताबाने गौरविण्यात आले.
शिरूर - हवेली तालुक्यातील नामवंत सोळा संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे, 'एक गाव-एक संघ' या प्रकारात संघांना सहभागी करून घेण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण आमदार सुनिल टिंगरे, सदाशिव पवार, सविता पऱ्हाड, अमोल शिरसाट, पंडित दरेकर, प्रताप टिंगरे, सोमनाथ दरेकर, जयकुमार मनोज, प्रमोद पऱ्हाड, सचिन भंडारे, हनुमंत कंद, योगेश भंडारे, उमेश भंडारे आदींसह ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून मुंबईचा शंकर (गोट्या) धोत्रे, दीपक पिळगावकर तर मनोज बेल्हेकर, प्रवीण कामटकर, प्रशांत पानमंद व विवेक भवार यांनी समालोचन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उमेश भंडारे, दिनेश गव्हाणे, स्वप्निल फडतरे, प्रणाम आरगडे, श्रीकृष्ण आरगडे आदींसह तरुण कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : महाराजा फाइटर्स, कोरेगाव भीमा.
द्वितीय क्रमांक : एच. के. फाइटर्स, लोणीकंद.
तृतीय क्रमांक : डिंग्रजवाडी फाइटर्स. चतुर्थ क्रमांक : घनोबा स्पोर्ट्स, धानोरे.
वढु बुद्रुक येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेले महाराजा फाइटर्स संघाचे खेळाडू. समवेत मान्यवर.