पुणे : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीसाठी बुधवारी ६१ टक्के मतदान झाले. कोणताही गैरप्रकार न होता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १२ हजार ५०९ वकिलांपैकी ७ हजार ६३५ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवाजीनगर येथे असलेल्या जिल्हा न्यायालयात चार ठिकाणी बुथ उभारण्यात आले होते. दुपारी १ पर्यंत केवळ ३० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे दुपारपर्यंत अत्यल्प प्रतिसाद मिळल्याचे दिसते. मात्र दुपारी तीननंतर मोठ्या प्रमाणात वकील मतदानासाठी दाखल झाले होते. त्यामुळे लाईन लावून मतदान करावे लागले. दरम्यान निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची खबरदारी न घेण्यात आल्याने काही ठिकाणी तुरळक गोंधळ झाला. तर निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे कर्मचारी व यंत्रणा देण्यात आली नसल्याची नाराजी काही उमेदवरांनी व्यक्त केली. मतदानासाठी पुणे बार व जिल्हातील सर्व बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी मदत केली. दिलेल्या कालावधीत शांततेत निवडणूक पार पडल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार यांनी दिली. शहरासह उपनगरांतील अनेक वकील मतदान असल्यानेन्यायालयात आले होते. तसेच उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी अनेक ज्युनिअर वकीलही जातीने कोर्टात हजर होते. उमेदवारांची माहिती देण्यासाठी कोर्टात ठिकठिकाणी टेबल मांडण्यात आले होते. या सर्वामुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी निर्माण झाली होती. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीची मतदानाची सोय करण्यात आली होती. पुण्यात शिवाजीनगर, बारामती, भोर, दौंड, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, जुन्नर, राजगुरूनगर, सासवड, वडगाव मावळ, पिंपरी येथे मतदानाची केंद्रे देण्यात आली होती. या सर्व ठिकाणी शांततेत मतदान झाले. या निवडणूकीत २५ जागांसाठी राज्यातून एकूण १६४ उमेदवार रिंगणात होते. त्यातील २३ उमेदवार पुण्यातील आहे. महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांसह दादर नगर हवेली आणि दिव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशात ही निवडणूक पार पडली. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी मतदानाची सोय करण्यात आली होती.
..............................
पार्किंग दिवसभर फुल्ल व कोंडीमतदानासाठी अचनाक मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाल्याने न्यायालच्या आतील व बाहेरील पार्किंग फुल झाले होते. त्यामुळे अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी गाड्या लावण्याने चारकाही वाहन आल्यास कोंडी होत होती. एक नंबर गेटजवळ वाहनांची सतत गर्दी होत असल्याने संतेचीपासून कार्टाकडे जाणा-या अंडरग्राऊंड पुलाखाली कोंडी झाली होती.