शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:46 AM

पुण्यात मनसेच्या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून एक वंचित आणि अपक्ष उमेदवाराचा यात समावेश आहे

पुणे : विधानसभा निवडणुकीत २१ मतदारसंघांत रिंगणात असलेल्या एकूण ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. वैध मतांच्या एकषष्ठांशही मते मिळवू न शकणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. ४४ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले. त्यात २१आमदार व त्यांचे प्रतिस्पर्धी २१ उमेदवार व अन्य दोघांचेच डिपॉझिट वाचले आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार संसदीय किंवा विधानसभानिवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक असते. निवडणुकीत एकषष्ठांश मते घ्यावी लागतात. मतदारसंघात निवडणुकीत तरच डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम परत मिळते.

२५९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त 

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३०३ उमेदवार उभे होते त्यापैकी २१ उमेदवार आमदार म्हणून निवडून आले तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना एकषष्ठांशपेक्षा जास्त मते मिळाली. तर आणखी दोन उमेदवारांचे मतेएकषष्ठांशपेक्षा जास्त आहेत त्यामुळे अशा एकूण ४४ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले आहे. तर २५९ उमदेवारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना एकूण मतदानाच्या एकषष्ठांश मतेही मिळाली नाहीत.

डिपॉझिट जप्त या दिग्गजांचा समावेश 

इंदापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रविन माने यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मनसेच्या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेे. त्यात कोथरुड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे, खडकवासला मतदारसंघातील उमेदवार मयुरेश वांजळे, कोथरुडचे गणेश भोकर आणि हडपसरचे साईनाथ बाबर यांचा समावेश आहे. याच बरोबर पर्वती मतदासंघातील अपक्ष उमेदवार आबा बागूल, वंचितचे निलेश आल्हाट यांचा समावेश आहे. पुरंदरचेे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांचे थोडक्यात डिपॉझिट वाचले आहे.

२१ मतदारसंघांत ३०३ उमेदवार

जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत ३०३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. 

संवर्गनिहाय जमा केले जाते डिपॉझिट 

सर्वसाधारण: १० हजार रुपये अनुसूचित जाती : ५ हजार रुपये अनुसूचित जमाती : ५ हजार रुपये

कोणत्या मतदारसंघात किती जणांचे डिपॉझिट जप्त ? 

जुन्नर : ८, आंबेगाव : ९, खेड आळंदी : ११, शिरूर : ९, दौंड : १२, इंदापूर : २२, बारामती : २१, पुरंदर : १३, भोर : ४मावळ : ४, चिंचवड : १९, पिंपरी : १३, भोसरी : ९, वडगाव शेरी : १४, शिवाजीनगर : ११, कोथरूड : १०, खडकवासला : १२, पर्वती : १३, हडपसर : १७, पुणे कॅन्टोन्मेंट : १८, कसबा पेठ : १० -  एकूण २५९

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MLAआमदारMONEYपैसाSocialसामाजिकPoliticsराजकारणMNSमनसेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी