पुणे - इंदापूर मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पक्षाशी एकनिष्ठ असलेले दुखावले गेले. त्यातून प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे. तर तिकडे अजित पवार गटाकडून आमदार दत्तात्रय भरणे हे नशीब अजमावत आहेत. त्यामुळे दुरंगी होणारी ही निवडणूक आता तिरंगी झाली आहे.
या मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी सरळ लढत होणार असे चित्र होते. मात्र, ऐनवेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून थेट शरद पवार गटात प्रवेश केला. तसेच त्यांना उमेदवारीही दिली. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनी आपली भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर पक्षाशी फारकत घेत तिसरी आघाडी निर्माण झाली. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्यात चुरशीची तिरंगी लढत होत आहे. यामध्ये मतदार कोणाच्या बाजुने उभे राहतात आणि कोणाचा विजय होतो हे येणारा काळच ठरवेल.
निवडणुकीतील कळीचे मुद्देआजी-माजी आमदार नको अशी नागरिकांची भूमिका असल्याने त्यांना नवा बाजी हवा आहे आणि त्यावरच सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहेत.तालुक्यातून ३० ते ३१ हेक्टर ऊस उत्पादन केला जातो, मात्र तीन सहकारी एक खासगी कारखाना असून देखील वेळेत ऊस घेऊन जात नाही. दर मिळतनाही त्यामुळे तालुक्यात चांगला दर देणार आणि त्यापेक्षा वेळेत ऊस नेणाऱ्याकारखान्याची गरज आहे.सर्व सोयी सुविधा असणारे रुग्णालयात हवे आहे. एमआयडीसी आहे पण उद्योगनाही त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणवाढत आहे.